खासदार बापट यांच्या माध्यमातून पुणे लोकसभा मतदार संघातील प्रत्येक भागात विकास कामे : महेश करपे

Date:


पुणे दि.१२ : पुणे लोकसभा मतदारसंघातील विविध शिक्षण संस्थांना खासदार बापट यांच्या खासदार निधीतून संगणकाचे वाटप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगर कार्यवाह महेश करपे आणि गौरव गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे लोकसभा मतदार संघातील अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्र, वानवडी पुणे, श्री समर्थ श्रीपती बाबा शिक्षण संस्थेचे जनता विद्यालय ताडीवाला रोड, श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या श्री शिवाजी मराठा हायस्कूल ४२५, शुक्रवार पेठ, शिक्षण प्रसारक मंडळींचे एस.पी.एम. पब्लिक इंग्लिश माध्यम शाळा, एच. व्ही. देसाई कॉलेज ५९६ बुधवार पेठ, पुणे म.न.पा. ची केशवराव जेधे शाळा क्र. १६, आणि एपीफनी स्कुल, ५ गुरुवार पेठ, पंच हौद, या शिक्षण संस्थाना ४७ संगणक, प्रिंटर व स्कॅनरचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना करपे यांनी सांगितले की खासदार बापट विकास कामे करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतात. कोणतीही संस्था लहान असो वा मोठी त्या संस्थेची अडचण लक्षात घेवून त्यांना मदत करण्यास बापट हे सदैव तत्पर असतात. शहरातील कोणत्याही भागात गेल्यास तेथे बापट यांच्या माध्यमातून विकास कामे झाल्याचे दिसते. खासदार बापट यांना कोणत्याही विभागातून काम कसे करून घ्यावयाचे याचे पूर्ण ज्ञान आहे. आज संगणकाच्या युगात आज वाटप केलेल्या संगणकामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना अधिकच फायदा होणार असल्याचे करपे यांनी सांगितले. यावेळी गौरव बापट, माजी नगरसेवक योगेश समेळ, कसबा भाजपा मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, अपंग कल्याणकारी संस्थेचे मुरलीधर कचरे, श्री.शिवाजी मराठा संस्थेचे श्री.जेधे, कसबा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक, महिला अध्यक्षा अश्विनी पांडे, छगन बुलाखे, राजेंद्र काकडे, राजू परदेशी, अरविंद कोठारे, निलेश कदम, दादा खत्री, भस्मराज तिकोने, प्रणव गंजेवाले, सुरेंद्र ठाकूर, गणेश परदेशी व इतर संस्थांचे मुख्याध्यापक, प्रतिनिधी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वगनाट्याची ‘परंपरा आणि योगदान’ सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे लोककला अभ्यासकांचे चर्चासत्रात प्रखर मत..

मुंबई – लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा कलेने समाजमनावर कोरलेली...

उद्या 12 झेडपी, 125 पंचायत समित्यांसाठी मतदान:2193 जागा, 7438 उमेदवार; 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदार करणार फैसला

मुंबई-राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या...

‘शून्य कचरा प्रकल्पा’त दररोज कचरा संकलन-आमदार हेमंत रासने यांची माहिती

पुणे, ता. ६ : कसबा-भवानी विधानसभा मतदारसंघात महानगरपालिकेच्या वतीने...

मोदी मजा करत आहेत, परदेशात जात आहेत..त्यांनी अशी कोणती क्रांती केली की, लोक त्यांच्यावर हल्ला करतील

नवी दिल्ली- लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोदींसोबत संसदेत...