Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पवारांना धमकी देणारा भाजप कार्यकर्ता,बावनकुळेजी हे रक्त नेमकं कुणाचं,अमोल मिटकरींचा सवाल

Date:

शरद पवारांना ‘तुमचा देखील दाभोलकर करू’ अशी धमकी देणारा सौरभ पिंपळकर भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर येते आहे. त्याचे भाजप नेत्यांसोबतचे फोटोही समोर येत आहेत . यातला एक फोटो पोस्ट करून बावनकुळेजी हे रक्त नेमकं कुणाचं? असा सवाल करत आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर वार केला आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘धमकी देणे हे आमच्या रक्तात नाही,’ असे म्हणत सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आरोप खोडून काढले होते. हाच धागा पकडून अमोल मिटकरी यांनी हा सवाल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून ‘तुमचा देखील दाभोलकर करू’ अशी धमकी मिळाली. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेत तक्रार दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास करून कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या. तर ‘मी धमकीची मी चिंता करीत नाही. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी सरकारची आहे. ज्यांच्या हातात सूत्र त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही. त्यांनी यासंबंधी जबाबदारी घ्यावी,’ असे म्हणत सुरक्षेचा चेंडू शरद पवारांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टाकला आहे.

शरद पवारांच्या धमकी प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘धमकी देणे हे आमच्या रक्तात नाही. ज्याने कोणी धमकी दिली असेल, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. तो राष्ट्रवादीचा असो, भाजपचा असो किंवा काँग्रेसचा असो, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी,’ अशी मागणी केली. मात्र, हा धमकी देणारा सौरभ पिंपळकर भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. तो अमरावतीचा राहणार असल्याचे समजते.

दुसरीकडे शरद पवारांना धमकी देणाऱ्या सौरभ पिंपळकरच्या ट्विटर हॅंडलवर मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मी धर्मनिरपक्षतेचा तिरस्कार करतो, असा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याचे भाजप नेत्यांसोबतचे फोटो समोर आलेत. त्यात एका फोटोत तो केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत तर दुसऱ्या फोटोमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत तो दिसतो आहे. हाच फोटो पोस्ट करून मिटकरींनी चंद्रशेखर बावनकुळे यांना जोरदार उत्तर दिले आहे.

अमोल मिटकरी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, हे आमच्या रक्तात नाही म्हणणारे बावनकुळेजी हे रक्त नेमकं कुणाचं आहे? पवार साहेबांना धमकी देणारा पिंपळकर तुमच्या बाजूला केक कापतोय , ‘राजकारण महाराष्ट्राचे’ ‘नर्मदाबाई पटवर्धन’ सौरभ पिंपळकर हे ट्विटर अकाउंट कुणाच्या रक्ताचे? असा सवाल त्यांनी केला असून, करारा जवाब मिलेगा, असे उत्तरही दिले आहे.

मास्टरमाईंड शोधा- डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक

अजित पवार यांनीही एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की, पवार साहेबांना सोशल मीडियावर ‘तुमचा लवकरंच दाभोळकर होणार…’ अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या धमकीची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपींना तातडीने गजाआड करावे. धमकी मागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावे, हेच राज्याच्या हिताचे असेल.अजित पवार पुढे म्हणतात की, पवार साहेबांचे संरक्षण करण्यास महाराष्ट्रातील जनता समर्थ आहे. परंतु डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक आहे. निवडणुका जवळ येऊ लागल्यानं यापुढे जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषावादाचे असे मुद्दे उपस्थित करुन समाजात द्वेष निर्माण करण्याचे, दुही माजवण्याचे, मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील. ते हाणून पाडले जातील. देशातील जनता आता सावध आहे. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांच्या भूलथापांना भुलणार नाही. कुणाच्याही कटकारस्थानांना बळी पडणार नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोकमान्यनगर प्रश्न पेटला; शेकडो नागरिकांचा घंटानाद आंदोलनातून सरकारला इशारा !

“घर आमच्या हक्काचं!”—काळे झेंडे, काळ्या कपड्यांसह लोकमान्यनगरवासियांनी सरकारचा केला...

राज्य जीएसटी अधिकाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन.

पुणे- राज्य जीएसटी अधिकाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून आपल्या...

“ज्या स्त्रीच्या वेदनेवरून कायदे बदलले, तिला समाजाने न्याय दिलाच पाहिजे” — डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. ११ डिसेंबर २०२५ :चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे...