डॉक्टरांचे योगदान समाजाकरिता तसेच गरिबांकरिता वाखणण्याजोगे- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

Date:

नागपूर-

डॉक्टरांचे योगदान समाजाकरिता तसेच गरिबांकरिता वाखणण्याजोगे आहे. गरीब रुग्णांमध्ये रोगांचे निदान  करुन  त्यावर वेळेत उपचार उपचार करणे हे अत्यंत महत्त्वाचे असून इंडियन मेडिकल असोसिएशन नागपूर शाखेची नवीन टीम यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडेल,  असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये  केले. आयएमए- नागपूर शाखेच्या 2023-24 या वर्षाकरिता  नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण  सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.  डॉ. वंदना काटे यांची आयएमए नागपूरच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी  ग़डकरी यांनी आयएमए- नागपूर शाखेच्या 2023-24 या वर्षाकरिता  नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना  शुभेच्छा दिल्या.

नागपूर हे खऱ्या अर्थाने हेल्थ हब झालेले आहे. डॉक्टरांनी ज्या चांगल्या सेवा दिल्या आहेत त्यामुळे ही विश्वसनीयता  वाढलेली आहे. या क्षेत्रात फार मोठी क्षमता आहे. नागपुरातील शासकीय महाविद्यालय आणि मेयोच्या विस्तारीकरणाचा कार्यक्रम सुद्धा प्रस्तावित आहे.नागपुरात अखिल भारतीय आयुर्वेद ज्ञानसंस्था –एम्स  तसेच अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध आहे.  यामध्ये केंद्र शासनाचे तसेच येथील डॉक्टरांचे योगदान आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

गरीब रुग्णांना एक्स-रे, सिटीस्कॅन यासारख्या सुविधा किफायतशीर  दरात मिळावा याकरिता विशाखापट्टनम येथे मेडिकल डिव्हाईस पार्क मध्ये उत्पादने तयार केली जात आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली.

***

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महायुतीला पाठिंबा, 11 फेब्रुवारीला नव्या महापौरांची निवडणूक

मुंबई- महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे....

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...