पीएमपीएमएल च्या पर्यटन बससेवेला चांगला प्रतिसाद

Date:

 पर्यटन बससेवा क्र. ४ चा . पुणे स्टेशन स्थानक येथून शुभारंभ
पुणे –महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या पर्यटन बससेवेला हौशी पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून
पर्यटन बससेवा क्र. ४ चा शुभारंभ परिवहन महामंडळाचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर(ऑपरेशन) श्री. सतिश गव्हाणे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी श्री. चंद्रकांत वरपे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पुणे स्टेशन डेपोचे मॅनेजर श्री. संजय कुसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पीएमपीएमएल च्या पुणे स्टेशन बस
स्थानक येथे वातानुकूलित ई-बस ला हिरवा झेंडा दाखवून पर्यटन बससेवा क्र. ४ चा शुभारंभ करण्यात आला.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर पुणे व पिंपरी चिंचवड शहरांनजीकच्या
धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता ७ पर्यटन बस मार्ग निश्चित केले असून वातानुकूलीत ई-बसेसव्दारे विशेष ‘पर्यटन बस’ सेवा
प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दिनांक ०१/०५/२०२३ पासून सुरू करण्यात
आलेली आहे. या ‘पर्यटन बस’ सेवेकरिता प्रति प्रवासी तिकीटदर रूपये ५००/- इतका आकारण्यात येतो.
पर्यटन बससेवा क्र. ४ द्वारे हौशी पर्यटकांना खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण या धरणांची
सफर करता येते. पीएमपीएमएल ने सुरू केलेल्या पर्यटन बससेवेचे बुकिंग १) डेक्कन जिमखाना, २) पुणे स्टेशन, ३)
स्वारगेट, ४) कात्रज, ५) हडपसर गाडीतळ, ६) भोसरी बसस्थानक, ७) निगडी, ८) मनपा भवन या पास केंद्रांवर करता
येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...