पुणे- शिवजयंतीच्या पूर्व तयारी साठी महापालिका भवनात आज कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली यावेळी कार्यकर्त्यांनी थेट आयुक्तांशी संवाद साधला आणि आपले म्हणणे सादर केले तर आयुक्तांनी देखील यावेळी आपण काय काय करणार याबाबत ची माहिती दिली .
पुणे महानगरपालिकेतर्फे प्रतिवर्षी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती साजरी करण्यात येते. त्यानिमिन पूर्वतयारी बैठक आज सोमबार, दि. १९/०१/२०२६ रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज संभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीस आयुक्त नवल किशोर राम,अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पृथ्वीराज बी.पी. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि)ओमप्रकाश दिवटे, उप आयुक्त (निवडणूक) प्रसाद काटकर, उप आयुक्त (परवाना व आकाश चिन्ह) माधव जगताप,उप आयुक्त (क्रीडा) आशा राउत, नगरसचिव योगिता भोसले आणि इतर मनपा अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत विविध शिवप्रेमी संघटनांनी शिवजयंती उत्सवाच्या आयोजनासंबंधी खालीलप्रमाणे सुचना केल्या आहेत.
- श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शहरातील सर्व पुतळ्यांची स्वच्छता करून पुष्पहार घालण्याची व्यवस्था केली जावी.
- पुणे महानगरपालिकेमार्फत रस्त्यावरील कचरा, राडारोडा उचलण्याचे आणि खड्डे बुजविण्याचे काम केले जावे.
- ज्या मार्गावरून चित्ररथ जाणार आहेत त्या मार्गावर पाण्याची व्यवस्था, फिरता दवाखाना व मोबाईल
टॉयलेटची सुविधा उपलब्ध करुन दिली जावी. - मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जावी.
- पुणे महानगरपालिकेमार्फत चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जाव्यात चित्ररथ स्पर्धाही घेतल्या ব্রাম্মান,
- शाळांमध्येही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी शाळांमध्येही चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, महानाट्य, वेशभूषा स्पधा घेतल्या जाव्यात.
- चित्ररथांसाठीच्या मिरवणूकीच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राबविण्यात यावी.
- पुणे महानगरपालिकेमार्फत शिवजयंतीची जाहिरात देण्यात यावी.
- लालमहाल येथील पुतळ्यांना रंगरंगोटी करण्यात यावी. धुवून साफ करण्यात यावेत, तसेच शम्र प्रदर्शनावावत सर्व शाळांना कळविण्यात यावे. विद्यार्थ्यांना प्रदर्शन स्थळी येणे-जाणे करिता बम-सेवा उपलब्ध करुन देण्यात यावी.
- शहरामध्ये जेवढे क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांची एक समन्वय बैठक त्या-त्या भागातील शिवजयंती कार्यकर्त्यांच्या मंडळाबरोबर घेतली जावी.
पुणे शहरात वाहतूकीचा खोळंबा होऊ नये याकरिता मिरवणूक मार्गासाठी पर्यायी मार्ग दिला तर वाहतूक कोंडी सोडविण्यास मदत होऊ शकते. - नव्याने समाविष्ट गावांमध्ये असणाऱ्या शिवस्मारकांची स्वच्छता करावी व विद्युत रोषणाई करून पुष्पहार अर्पण करावा.
*शहरात १९ फेब्रुवारी रोजी ड्राय डे करण्यात यावा.
- महापालिका आयुक्त यांनी खालील बाबींचे आश्वासन दिले
महापालिकेमार्फत सर्व ठिकाणी साफसफाई, रंगरंगोटी, रोषणाई केली जाईल. पुणे शहरात आवश्यक अमेल तेथील झाडांच्या फांद्या छाटण्यात येतील. रस्ते दुरुस्त केले जातील. - फायवर ऑपटिकल केबल्स काढण्यात येतील.
लाल महालाची स्वच्छता करण्यात येईल, शिवजयंतीच्या दिवशी लाल महाल जास्त वेळासाठी खुला
ठेवण्यात येईल, तेथील दुरुस्तीविषयक कामकाज लवकर पूर्ण करण्यात येईल. - पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाची एक टिम शहरातील विविध ठिकाणी भेट देवून तेथील शिवजयंतीबावत असलेले समस्या समजून घेतील व पुढील योग्य ती कार्यवाही करतील.
- वाहतूक व्यवस्थेसाठी पर्यायी मार्गाची पोलीस अधिकारी व्यवस्था करतील. ट्रॅफिक वॉर्डनची व्यवस्था केली जाईल. तसेच याबाबत लेखी पत्रव्यवहार करण्यात येईल.
- नवीन गावांमध्येही ज्या जल्लोषाने शिवजयंती साजरी केली जाते त्याच पध्दतीने साजरी केली जाईल. सर्व ठिकाणी साफसफाई केली जाईल, पुष्पहार अर्पण केले जातील. दुरुस्तीविषयक कामे करण्यात येतील. *मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली जाईल.
चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, महानाट्य, वेशभूषा स्पर्धा घेण्याबाबत सांस्कृतिक विभागास सूचना देण्यात येतील.
१९ फेब्रुवारी रोजी ड्राय डे करण्याबाबत जिल्हाधिकारी यांस पत्र व्यवहार करण्यात येईल.
पुणे शहरात शिवजयंती उत्सहाने साजरी होणेकामी मंडळानी त्यांच्या विविध सूचना लेखी स्वरुपात आयुक्त कार्यालयात देणेबाबत महापालिका आयुक्त यांनी आवाहन केले.

