माजी नगरसेवक सचिन दोडके,बाळासाहेब धनकवडे,सायली वांजळे,विकासनाना दांगट भाजपमध्ये..पुण्यासह पिंपरीत राष्ट्रवादीला मोठ्ठे खिंडार

Date:

दोन्ही राष्ट्रवादींसह उद्धव ठाकरेंना जोरदार दणका

पुणे- भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण,भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ,मंत्री चंद्रकांत दादा पाटील माजी सभागृहनेते गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले,धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे आणि पिंपरीतील दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे,वडगाव शेरीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे,त्यानंतर माजी नगरसेवक आणि २ वेळा विधानसभा लढविलेले सचिन दोडके,माजी नगरसेवक बाळासाहेब धनकवडे,सायली वांजळे,विकास नाना दांगट यांनी पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.दुसरीकडे,अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला मोठे यश मिळाले असून,अजित पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे.

विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांनी भाजप सोडून शरद पवार गटाची ‘तुतारी’ हाती घेतली आणि विजय मिळवला. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बापूसाहेब पठारे यांनी भाजप सोडताना तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती, असे बोलले जाते. आता फडणवीसांच्याच सूचनेनुसार सुरेंद्र पठारे घरवापसी करत असल्याने पठारे कुटुंबाने एकाच वेळी दोन्ही प्रमुख पक्षांशी ‘नाळ’ जुळवून ठेवल्याची चर्चा रंगली आहे. सुरेंद्र यांच्यासोबतच पुण्यातील माजी नगरसेवक विकास दांगट, सायली वांजळे आणि बाळा धनकवडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुण्यात भाजपची ताकद वाढली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आक्रमक रणनीती आखली आहे. आजच्या प्रवेश सोहळ्यात अजित पवार गटाचे तब्बल 8 आणि इतर पक्षांचे 7 अशा 15 बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राजू मिसाळ आणि माजी महापौर मंगला कदम यांचे पुत्र कुशाग्र कदम यांचा समावेश आहे. ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनीही भाजपची वाट धरल्याने महाविकास आघाडीलाही मोठा धक्का बसला आहे.

एकीकडे मुंबईत इनकमिंगचा सोहळा सुरू असताना, दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या निष्ठावंत इच्छुकांनी बंडाचा इशारा दिला आहे. “आम्ही 820 जणांनी मुलाखती दिल्या, पक्षासाठी वर्षे खर्ची घातली, मग आता उपऱ्यांचे लाड कशासाठी?” असा सवाल निष्ठावंतांनी उपस्थित केला आहे. “बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्यास आम्ही शांत बसणार नाही, थेट बंड करू,” असा इशारा स्थानिक इच्छुकांनी दिला आहे. त्यामुळे हे ‘मेगा इनकमिंग’ भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

पिंपरी चिंचवड मधून भाजप प्रवेश केलेल नेते

कुशाग्र कदम – मुलगा, माजी महापौर मंगला कदम
प्रसाद शेट्टी – माजी नगरसेवक, अजित पवार गट
उषा वाघेरे – माजी स्थायी समिती अध्यक्षा, अजित पवार गट
प्रभाकर वाघेरे – माजी उपमहापौर, अजित पवार गट
प्रशांत शितोळे – माजी अध्यक्ष, स्थायी समिती – अजित पवार गट
समीर मासुळकर – माजी नगरसेवक, अजित पवार गट
जालिंदर शिंदे – माजी नगरसेवक, अजित पवार गट
राजू मिसाळ – माजी उपमहापौर, अजित पवार गट
विनोद नढे – माजी नगरसेवक, अजित पवार गट
संजोग वाघेरे – शहराध्यक्ष, ठाकरे गट
अमित गावडे – माजी नगरसेवक, ठाकरे गट
रवी लांडगे – भाजपचे माजी नगरसेवक ( सध्या ठाकरे गट )
मीनल यादव – माजी नगरसेविका, ठाकरे गट
संजय काटे – माजी अपक्ष नगरसेवक, महायुतीचे कार्यकर्ते
नवनाथ जगताप – माजी अध्यक्ष, स्थायी समिती ( शरद पवार गट )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आबा बागुल संपूर्ण परिवारासह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल …

ठाणे |पुणे- संपूर्ण हयात ज्या परिवाराने कॉंग्रेस मध्ये घालविली,...

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...