शस्त्र प्रदर्शनातून महापुरुषांच्या इतिहासाला उजाळा 

Date:

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त समस्त राजपूत समाजातर्फे आयोजन


पुणे : गवा, गेंड्याच्या कातडीपासून बनवलेल्या ढाली, तलवारी, चिलखत, वाघनखे, कट्यार, दांडपट्टा, ठासणीच्या बंदुका अशी २५० ते ३०० वर्षांपूर्वीची ३०० हून अधिक शस्त्रे पुणेकरांना पाहायला मिळाली.  वीरशिरोमणी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांसह वीर पुरुषांनी त्याकाळी वापरलेल्या शस्त्रांचे महत्व समजून घेत, भारताच्या शौर्याच्या इतिहासाला यानिमित्ताने उजाळा देण्यात आला. 
समस्त राजपूत समाजाच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८३ व्या जयंतीनिमित्त बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानात शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात  आले होते. प्रदर्शनाचे उदघाट्न खडक पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संगीता यादव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी  ॲड.प्रताप परदेशी, स्वप्नील नाईक, किशोर रजपूत, प्रमोद  परदेशी, गोपी पवार, विजय परिहार, प्रेम राठोड हे उपस्थित होते. 
वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त हा आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार देखील अर्पण करण्यात आला. यद्मदत रणजित हजारे, राहूल राठोड, नितीन राठोड यांच्या रॉयल लेगसी ट्रस्ट यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रदर्शनाला माजी महापौर प्रशांत जगताप, अजय खेडेकर, विजय कुंभार यांसह अनेक समाजिक संस्थाचे प्रतिनिधी हजर होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शून्य साइड इफेक्ट्स असलेले नैसर्गिक, क्रांतीकारी, वजन कमी करणारे उत्पादन

नैसर्गिक जीएलपी – 1 सायन्सवर आधारित, प्रती महिना २००० रुपयांच्या वाजवी किंमतीत...

पत्रकारितेला जनसुरक्षा कायद्याचा फटका बसणार नाही:मुख्यमंत्र्यांचा शब्द

पत्रकार संघटनांबरोबर देवेंद्र फडणवीस यांची बैठक. मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी)-...

धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात डीन डॉ. केळकर,घैसास ही दोषी,पन्नास पानांचा अहवाल सादर

पुणे : मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग...