परिज्ञा कस्तुरेला रौप्य तर समीक्षा शेलारला कांस्य
भोपाळ-
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ज्युदोच्या शेवटच्या दिवशी महिलांच्या गटात सर्वसाधारण उपविजेतेपद पटकाविले आणि कौतुकास्पद कामगिरी केली. आज परिज्ञा कस्तुरे हिने रौप्य तर समीक्षा शेलार हिने कांस्यपदकाची कमाई केली.
६३ किलो खालील गटात मुंबईची खेळाडू प्रतिज्ञा हिला चुरशीच्या अंतिम फेरीत दिल्लीच्या हिमांशी टोकस हिच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. ६३ किलो वरील गटात समीक्षा हिला उपांत्य फेरीत मध्य प्रदेशच्या नंदिता कुमारी विरुद्ध हार पत्करावी लागली होती. त्यानंतर झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत तिने हरियाणाच्या नित्याकुमारी हिचे आव्हान मोडून काढले आणि पदकावर आपले नाव कोरले.

