पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: इंडस्ट्री इन्स्टिट्यूट लिंकेज या विषयावर दोन दिवशीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. मुकुल सुतोने कुलगुरू सीओईपी टेक्निकल युनिव्हर्सिटी पुणे , डॉ.एन.बी. पासलकर माजी संचालक तंत्रशिक्षण मंडळ, डॉ.संदिप मेश्राम सीओईपी टेक्निकल युनिव्हर्सिटी, प्रशांत लिखिते जनरल मॅनेजर टीसीएस प्रा.ली., डॉ.रंजन वानखेडे यांचे शुभ हस्ते व अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे खजिनदार श्री. विजयसिंह जेधे, प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांचे उपस्थित झाले. या वेळी डॉ. सुतोने यांनी बहुशाखीय, आंतरशाखीय आणि अनुशासनात्मक शिक्षण प्रणाली व त्याची महाविद्यालयीन अंमलबजावणी व त्याचा विद्यार्थ्यांना होणारा फायदा या विषयावर मार्गदर्शन करताना नव्या युगासाठी तंत्रज्ञानाधिष्ठित जागतिक बदलांना देशाला सज्ज करण्यासाठी ‘नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अतिशय उपयोगाचे आहे. विद्यार्थ्याची बौद्धिक, भावनिक, सामाजिक प्रगती होण्याच्या दृष्टीनं बहुशाखीय शिक्षणप्रणाली यामध्ये प्रस्तावित असणार आहे. ॲकॅडमीक क्रेडीट बँक, मल्टीपलएन्ट्री, मल्टीपलएक्झिट, क्रेडीट मोबोलीटी मेकॅनिझम आणि ट्रान्सडीसीप्लीनरी शिक्षण पद्धतीचावापर या घटकांचे नव्या शैक्षणिक धोरणातील महत्व या वेळी पटवून दिले. भारत देशाला जागतिक ज्ञानसत्ता बनविण्यासाठी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे परिवर्तनाचे साधन ठरणार आहे असे या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. एन.बी. पासलकर यांनी जॉय फुल लर्निंग विषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक समन्वयक डॉ.काशिनाथ मुंडे यांनी केले. प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांनी महाविद्यालयातून सुरु असलेल्या विविध संशोधन प्रकल्पांची माहितीत दिली.
सदर कार्यक्रमासाठी डॉ. मुकुल सुतोने, डॉ.संदिप मेश्राम, डॉ.एन.बी. पासलकर , डॉ.रंजन वानखेडे, प्रशांत लिखिते, विजयसिंह जेधे, डॉ.सुनिल ठाकरे, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. काशिनाथ मुंडे, प्रा.गणेश कोंढाळकर, सर्व विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयातील, महाराष्ट्रातील इतर विद्यापीठ क्षेत्रातील प्राध्यापक, औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाने हि कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ.प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

