Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांच्या हस्ते खडकी येथे लष्करी रुग्णालयात पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण

Date:

पुणे, 3 मे 2023

पुण्यातील  खडकी येथील लष्करी रुग्णालयात, पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतींवर उपचार करणारे सर्वात मोठे केंद्र आहे. पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या पॅराप्लेजिक आणि टेट्राप्लेजिक सैनिकांना सेवा देणारे हे केंद्र आता रूग्णांना अद्ययावत सेवा देत आधुनिकीकरणाच्या नवीन टप्प्यात दाखल झाले आहे. लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख (जीओसी-इन-सी सदर्न कमांड) लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह एव्हीएसएम,वायएसएम, एसएम, व्हीएसएम यांनी आज एका विशेष सोलर वॉटर हीटिंग प्लांटचे आणि संगणकीकृत डायनॅमिक स्टेअर ट्रेनरचे उद्घाटन केले.

या केंद्रासाठी विशेष सोलर वॉटर हीटिंग प्लांटची संकल्पना सोल्जर्स इंडिपेंडेंट रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन (सिर्फ) या अग्रगण्य स्वयंसेवी आणि कल्याणकारी संस्थेची आहे.सैनिकांचे अधिकाधिक हित साधण्यासाठी उभ्या राहिलेल्या या संस्थारूपी चळवळीचे नेतृत्व सिर्फच्या सह-संस्थापक सुमेधा चिथडे अव्यहतपणे करत आहेत. त्यांचे पती दिवंगत योगेश चिथडे हे माजी सैनिक होते. त्यांनीच सुरू केलेल्या या भव्य कल्याणकारी कार्याला सुमेधा यांनी तितक्याच दूरदर्शीपणे आणि उत्कृष्टपणे पुढे नेले आहे. पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतीमुळे आयुष्य आमूलाग्र बदलून गेलेल्या शूर सैनिकांच्या जीवनात पुन्हा आनंद यावा आणि त्यांना आराम मिळावा यासाठी सुमेधा यांनी खर्च केलेली शक्ती आणि त्यांचा दृढनिश्चय त्यांच्याशी संवाद साधताना दिसून येतो. विशेष वॉटर प्लांटच्या उभारणीमुळे रुग्णांच्या या विशेष गटासाठी रुग्ण सेवेचा एक नवीन टप्पा  सुरू झाला आहे.

सिर्फ टीमचा लक्ष केंद्रित दृष्टिकोन आणि अथक समर्पणाची भावना याची प्रशंसा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांनी केली. त्यांनी पॅराप्लेजिक सैनिकांना कॉम्प्युटराइज्ड डायनॅमिक स्टेअर ट्रेनर समर्पित केले. या ट्रेनरमुळे गंभीर अपंगत्व आलेल्या रूग्णांना पुन्हा उभे राहण्याचे आणि चालण्याचे प्रशिक्षण देणे शक्य होईल. अत्याधुनिक उपकरणे पॅराप्लेजिक रूग्णांच्या कमकुवत झालेल्या स्नायूंची क्षमता वाढवतात. त्यामुळे त्यांना पायऱ्या चढणे, उतारावर चालणे आणि कमीतकमी आधार घेत उभे राहणे यासारख्या क्रिया पुन्हा सुरू करता येतात.संगणकीकृत स्टेअर ट्रेनर अनेक महिने रुग्णामध्ये झालेल्या सुधारणेचे वस्तुनिष्ठपणे निरीक्षण करून प्रशिक्षण आणि मूल्यांकन करतो. या केंद्रात दाखल असलेल्या रुग्णांना अद्ययावत आणि सर्वोत्तम आधुनिक सुविधा पुरविण्याच्या गरजेचा सिंह यांनी पुनरुच्चार केला. सुमेधा चिथडे आणि सिर्फच्या टीमचा त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल आणि सैनिकांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेल्या समर्पणाबद्दल सिंह यांच्या हस्ते यावेळी सत्कार झाला.

 भारतीय सशस्त्र दले युद्ध आणि शांतता या दोन्ही काळात स्वतःची काळजी स्वतः घेतात. पुण्यातील खडकी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या सैनिकांवर उपचार केले जातात आणि स्पाइनल कॉर्ड इज्युरी सेंटरमध्ये त्यांचे पुनर्वसन केले जाते. जखमी आणि त्यांची काळजी घेणाऱ्या सर्वांसाठी ही प्रक्रिया वेदनादायक आणि निराशाजनक असते, पण हळूहळू का होईना त्यांना त्यांच्या चिकाटीचे फळ मिळते. रुग्णांच्या जीवनात नवीन आशा निर्माण करून त्यांच्या जीवनाला नवा अर्थ देण्यासाठी या अत्याधुनिक केंद्रातील समर्पित चिकित्सक, नर्सिंग कर्मचारी, पुनर्वसन तज्ञ चोवीस तास काम करतात. या रूग्णांसाठी अत्यावश्यक असलेले पुनर्वसन करून त्यांना समाजाचा पुन्हा एक भाग बनवणे यासाठी हे केंद्र प्रयत्नशील आहे. हे दृढनिश्चयी सैनिक रूग्ण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅरा-ऍथलेटिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणेकरांसाठी खुशखबर! पीएमआरडीएतर्फे ८३३ घरांची बंपर सोडत जाहीर!

अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी सुवर्णसंधी; १५ डिसेंबरपासून अर्ज...

सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात महिलांना उद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन

पुणे : महिला उद्योजक होऊन स्वावलंबी व्हाव्यात याकरिता काँग्रेस...

एपस्टीन फाईलमुळे भारतात खरेच राजकीय भूकंप होणार ?

जेफ्री एपस्टीन:एक श्रीमंत वित्त व्यवस्थापक ज्याचेवर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक...

टॉप-8 कंपन्यांचे मूल्य ₹79,130 कोटींनी घटले:रिलायन्सचे मार्केट कॅप ₹20,434 कोटींनी वाढले

मुंबई बाजार मूल्यांकनाच्या दृष्टीने, देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी 8...