पीटर बर्वाश इंटरनॅशनलने पुण्यात निवडक इलेसियम क्लब्ससोबतच्या सहयोगाची घोषणा केली.
पुणे, १० फेब्रुवारी २०२३: पीबीआय उपक्रमाने जागतिक दर्जाच्या टॅलेंटला वाव देण्यासाठी जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण सेवा दिल्या आहेत. या सहयोगामुळे पुणेकरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त प्रशिक्षकांद्वारे प्रदान केला जाणारा जागतिक स्तरावर प्रसिद्ध टेनिस उपक्रम मिळतो. प्रशिक्षकांना जगभरातील विविध टेनिस संघटनांसाठी विकास धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रँडस्लॅम स्तरावर खेळाचे प्रशिक्षण आयकॉन्सचा विस्तृत अनुभव आहे.
हा उपक्रम तरुणांच्या विकासापासून ते प्रौढ प्रोग्रामिंगपर्यंत सर्व प्रकारच्या व्यक्तींच्या गरजांची पूर्तता करतो. पीबीआय सध्या सहज यमलापल्ली, ऋषी रेड्डी, श्रीवल्ली भामिदिपत्ती यांसारख्या काही खेळाडूंसह भारतीय टेनिसच्या भावी पिढीतील टॅलेंटचे नेतृत्व करत आहे. लिएंडर पेस, अँडी रॉडिक, सांचेझ विकारिओ, अबीगेल स्पीयर्स यांसारखे खेळाडूही पीबीआयशी संलग्न आहेत. रेने झोंडाग (पीबीआय अध्यक्ष), सेझर मोरालेस (पीबीआय इंडिया टेक्निकल डायरेक्टर), मिलोस मिलुनोविक (पीबीआय पुणे टेक्निकल डायरेक्टर) आणि गुरपवित सिंग (संस्थापक, इलेसियम क्लब्स) यांनी या लॉन्चची सह-घोषणा केली.
इलेसियम क्लब्स, बावधन, पुणे अद्वितीय असण्यासह १२.५ एकरहून अधिक जागतिक दर्जाच्या क्रिडा पायाभूत सुविधेवर पसरलेले आहे. यामध्ये यशस्वी पीबीआय उपक्रम राबवण्याकरिता सर्व आवश्यक जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आहेत, जसे विविध कोर्ट्सपासून प्रशिक्षण सुविधा, स्ट्रेन्थ व कंडिशनिंग सुविधा, स्विमिंग पूल्स, थेरपी, रिकव्हरी रूम्स आणि स्पोर्ट्स सायन्स टीम. पीबीआय व इलेसियम क्लब्सने यापूर्वीच पुण्यातील तीन आणखी इलेसियम क्लब्स स्थानांवर सॉलिटेअर ग्रुपसोबत करार केला आहे आणि मुंबई, सोलापूर व चेन्नईमधील अनेक नवीन क्लब प्रकल्पांमध्ये विस्ताराचा शोध घेत आहेत.
इलेसियम क्लब्स अनेक आंतरराष्ट्रीय अकॅडमी आणि ब्रॅण्ड भागीदारांसोबत काम करतात. इलेसियम पीबीआय, गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया, एफसी बार्सिलोना, रिकी हॅटन (बॉक्सिंग) आणि मायकेल फेल्प्स स्विमिंग सारखे आंतरराष्ट्रीय अकॅडमी ब्रॅण्ड्स, तसेच बॅडमिंटनसाठी पदुकोण स्पोर्ट्स मॅनेजमेंट, चेन्नईयन एफसी, ठाणे सिटी एफसी, पडेल टेनिस फेडरेशन आणि पिकलबॉल असोसिएशन ऑफ इंडिया यांसारख्या अनेक आघाडीच्या भारतीय क्रीडा विकास ब्रॅण्ड्सना होस्ट करते.
इलेसियम क्लब्ससोबतच्या या नवीन सहयोगाबाबत पीबीआयचे अध्यक्ष रेने झोंडाग म्हणाले, ‘‘स्पर्धात्मक क्रीडापटू आणि मनोरंजक खेळाडूंना पीबीआय उपक्रम ऑफर करण्यासाठी आम्ही पुण्यासह एका नवीन भौगोलिक स्थानामध्ये प्रवेश करत आहोत, याचा मला आनंद होत आहे. खेळ लोकांना एकत्र आणतो आणि इलेसियम क्लब्ससोबत या उपक्रमाचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. इलेसियम क्लब्ससोबत सहयोग केल्याने नवीन शहरे आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी दरवाजे खुले होतात. मी हा सहयोग अधिक बहरताना आणि सर्व वयोगटातील लोकांना लाभदायी परिणाम देताना पाहण्यास अत्यंत उत्सुक आहे.’’
इलेसियम क्लब्सचे संस्थापक गुरपवित सिंग म्हणाले, ‘‘मला आमच्या शिरपेच्यात आणखी एका तुऱ्याची भर करताना अत्यंत आनंद होत आहे. प्रगत टेनिस प्रशिक्षण आणि कार्यशाळा आणण्यासाठी आम्ही भागीदारी करू शकणाऱ्या सर्वोत्तम अकॅडमींपैकी एक पीबीआय आहे. आम्ही आशा करतो की शिक्षण, कार्यशाळा आणि पायाभूत सुविधांचा वाढलेला स्तर भारतातील टेनिस इकोसिस्टमला चालना देण्यासाठी आम्हाला मदत करेल.’’
इलेसियम क्लब्स पुढील तीन वर्षांत क्लब केंद्रांमध्ये १० जागतिक दर्जाचे पीबीआय उपक्रम राबवण्याची आणि सहयोगी क्लब्समध्ये अनेक आउटरीच कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखत आहे. प्राइम लोकेशन्सवर अत्याधुनिक सुविधा देऊन आणि सर्व सुविधांवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा पुरवून भारतात टेनिस खेळण्याचा आनंद पुन्हा जागृत करण्याचा हेतू आहे.
पीबीआयकडे सध्या २०० हून अधिक विद्यार्थी बेंगळुरूमधील मुख्य उच्च-कार्यक्षमता केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. एकट्या जीएलसीमधील इलेसियम क्लब्ससोबत १००० हून अधिक पालक अगोदरपासून संलग्न असताना एक मजबूत इकोसिस्टम आधीच अस्तित्वात आहे. ११/१२ फेब्रुवारी २०२३ रोजी पीबीआय कोचिंग पद्धतीचा अनुभव घेण्यासाठी योजनांमध्ये प्रौढ आणि मुलांसाठी डेमो सत्रांचा समावेश आहे.
पीबीआय बाबत:
१९७५ मध्ये स्थापना करण्यात आलेली पीटर बर्वाश इंटरनॅशनल (पीबीआय) ही जगातील प्रमुख टेनिस व्यवस्थापन कंपनी आहे, जी जगभरातील पंचतारांकित रिसॉर्ट्स, हॉटेल्स व टेनिस क्लब्ससाठी टेनिस सूचना, कार्यक्रम विकास, विपणन, ऑपरेशन्स आणि दैनंदिन टेनिस क्रियाकलापांमध्ये विशेषज्ञ आहे. पीबीआयचे संस्थापक पीटर बर्वाश हे ४५ वर्षांहून अधिक काळ टेनिस उद्योगातील हॉल ऑफ फेम आयकॉन म्हणून जगप्रसिद्ध प्रशिक्षक, लेखक, टेनिस टीव्ही समालोचक आणि प्रेरक वक्ता आहेत. नाविन्यपूर्ण टेनिस फॉर लाइफ® सूचना आणि अपवादात्मक ग्राहक सेवेसाठी ओळखली जाणारी पीबीआय युनायटेड स्टेट्स, मेक्सिको, हवाई, कॅरिबियन, आशिया, मध्य पूर्व आणि युरोपमधील ५५ विशेष मालमत्तांसाठी टेनिस उपक्रमांचे मार्गदर्शन करते. अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: www.pbitennis.com
इलेसियम क्लब्स बाबत:
इलेसियम क्लब्स ही एण्ड-टू-एण्ड रिअल इस्टेट सर्विसेस कंपनी आहे, जी जगाला सर्वोत्तम स्थान बनवण्यासोबत त्यामध्ये लोकांना सुसज्ज करण्यावर मिशनवर आहे. आनंदी व आरोग्यदायी समुदायांच्या निर्मितीसाठी क्रीडा व फिटनेस ही कंपनीची साधने आहेत.
गुरपवित सिंग व अमित गोएल यांच्या अभिनव विचारामधून स्थापना करण्यात आलेली इलेसियम क्लब्स जीजीसी, एसपीआर ग्रुप, सॉलिटेअर ग्रुप, द वाधवा ग्रुप इत्यादींसारख्या मोठ्या डेव्हलपर्ससाठी सुविधांच्या जागांवर आरओआय वितरित करते आणि टाऊनशिप मालमत्ता व्यवस्थापनात विशेषीकृत आहे. १४ हून अधिक जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय अकॅडमी भागीदार व ब्रॅण्ड्स आणि वर्षभरात २०० हून अधिक इव्हेण्ट्स करणाऱ्या इव्हेण्ट्स कॅलेंडरसह इलेसियम क्लब्सचा विस्तार संपूर्ण भारतात ४ सक्रिय क्लब्स आणि १७ क्लब्समध्ये झाला आहे.

