पुणे-प्रभाकर नरहर महाजन (वय ९३) यांचे २६ एप्रिल रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. राजगुरुनगर जवळील कडूस येथील रामभाऊ म्हाळगी हायस्कूलचे ते माजी विश्वस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी, वैवाहित मुलगा, वैवाहित मुलगी, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांचे ते वडील होत. वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले.