सिगारेटचे बॉक्स चोरणाऱ्या राजस्थानच्या टोळीला पकडले

Date:

पुणे-किराणा मालांचे दुकान फोडून विक्रीसाठी प्रतिबंधित नसलेल्या सिगारेटचे बॉक्स चोरणार्‍या एका आंतरराज्य टोळीला पुणे पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून चार लाख दहा हजारांचा ऐवज जप्त केला आहे. चोरलेल्या सिगारेटचे बॉक्स कमी किंमतीत विकून चोरटे पैसे मिळवित असल्याचे तपासात उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी येथे दिली आहे.

पुण्यात १० घरफोडीचे गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार बुधाराम बियाराम चौधरी (वय -४५ रा.वडगाव शेरी, पुणे, मुळ-रा. राणी वाल, ता. जितारण, जि. पोली, राजस्थान) ; रामलाल ढगळाराम चौधरी वय २९ आणि महाविर बगदाराम मेघवंशी (वय -१९ दोघेही रा.दत्तवाडी, पुणे,मूळ-राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.पुण्यातील नानापेठमधील जय अंबे ट्रेडर्स किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी पाच लाख दहा हजारांची सिगारेट पाकिटे चोरुन नुकतीच नेली होती. युनीट एककडून याबाबत आरोपींचा शोध सुरु होता. तांत्रिक विश्लेषणाव्दारे तीन जण रिक्षातून प्रवास करीत वडगाव शेरीत उतरल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार पोलीस अंमलदार आण्णा माने, अमोल पवार यांना आरोपींची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपी बुधारामला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने नाना पेठेतील दुकानातून सिगारेटची चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर त्याच्या दोन साथीदारांनाही पथकाने अटक केली.पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी बुधारामने मंडईतील दुकानातूनही सिगारेट चोरल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध यापुर्वी विश्रामबाग, कोंढवा, समर्थ,हडपसर परिसरात घरफोडी, चोरीचे दहा गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद, एपीआय आषिश कवठेकर, उपनिरीक्षक अजय जाधव, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी,इम्रान शेख, निलेश साबळे, शुभम देसाई,दत्ता सोनावणे, महेश बामगुडे, विठ्ठल साळुंखे, अय्याज दड्डीकर, अभिनव लडकत,राहुल मखरे,शशिकांत दरेकर, अनिकेत बाबर, तुषार माळवदकर यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...