‘वी’च्या नवीन ३६८ आणि ३६९ रुपयांच्या मासिक रिचार्जेससोबत – सन एनएक्सटी आणि सोनी लिवची सबस्क्रिप्शन आणि दररोज २ जीबी डेटा

Date:

·         संपूर्ण महिनाभर दररोज अधिक जास्त डेटा व त्यासोबत मनोरंजन देणाऱ्या ‘वी’च्या स्मार्ट रिचार्ज प्लॅन्सचा आनंद घ्या.

·         ‘वी’ ही एकमेव टेलिकॉम कंपनी आहेजी क्षेत्रीय कन्टेन्टचा लाभ घेता यावा यासाठी आपल्या ग्राहकांना सन एनएक्सटी बंडल्ड प्लॅन्स प्रस्तुत करत आहे.

भारतातील आघाडीची टेलिकॉम सेवा पुरवठादार ‘वी’ने मनोरंजनाचा खजिना असणारे दोन मासिक रिचार्ज प्लॅन्स सुरु केले आहेत. देशभरातील आपल्या प्रीपेड युजर्सना मनोरंजनाचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी ‘वी’ ने ही अनोखी संधी उपलब्ध करवून दिली आहे. १ महिन्याची वैधता असलेल्या या प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉल्सदर दिवशी १०० एसएमएसओटीटी लाभ आणि दररोज २ जीबी डेटा या आकर्षक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

‘वी’च्या ३६८ रुपयांच्या रिचार्जसोबत प्रीपेड युजर्सना सन एनएक्सटीची सबस्क्रिप्शन टीव्ही आणि मोबाईलवर मिळत आहे.  त्यामुळे त्यांना तामिळमल्याळमतेलगूकन्नडमराठी व बांग्ला या भाषांमध्ये भरपूर उत्तमोत्तम सिनेमेटीव्ही शोम्युझिक व्हिडीओचा आनंद घेता येईल. त्याशिवाय दररोज २जीबी डेटा + अनलिमिटेड कॉल्स + दर दिवशी १०० एसएमएस हे लाभ देखील मिळत आहेत. या सर्व टेल्को व नॉन-टेल्को लाभांची वैधता ३० दिवस आहे.

४००० पेक्षा जास्त सिनेमे१०००० पेक्षा जास्त तासांचा व्हिडिओ ऑन डिमांड कन्टेन्ट आणि ३३ लाईव्ह टीव्ही चॅनेल्स देणारे सन एनएक्सटी हे क्षेत्रीय मनोरंजनाची आवड असणाऱ्या दर्शकांचे अतिशय आवडीचे ऍप आहे. दक्षिण भारतीय कन्टेन्टच्या चाहत्यांसाठी सन एनएक्सटीच्या विशाल आणि सर्वसमावेशक पोर्टफोलिओमध्ये रांगीलाथथती चार्जबघीरामहावीरयरथिरुचित्रबलमअब्बारअन्नातथेबीस्टडॉक्टर यासारखे नवनवीन ब्लॉकबस्टरएथिर नीचलसुंदरीप्रेमास रंग यावेवोंतरी गुलाबीकालीवीदूकनलपूवुराधिका यासारखे लोकप्रिय टीव्ही शो देखील आहेत.  

‘वी’च्या ३६९ रुपयांच्या रिचार्जमध्ये प्रीपेड ग्राहकांना सोनी लिवच्या अतिशय लोकप्रिय कन्टेन्टबरोबरीनेच वेगवेगळ्या खेळांचे सामने लाईव्ह पाहण्याचा आनंद आपल्या मोबाईलवर मिळवता येईलत्यासोबत दररोज २जीबी डेटाअनलिमिटेड कॉल्स व दर दिवशी १०० एसएमएस यांचा देखील समावेश आहे.  

हे रिचार्ज घेणाऱ्या ‘वी’ युजर्सना सोनी लिवचे लोकप्रिय ओरिजिनल्ससिनेमेशोखेळांचे लाईव्ह सामनेएक्सक्लुसिव्ह कन्टेन्ट आणि इतरही बरेच मनोरंजन मोबाईलवर मिळवता येईल. युईएफए चॅम्पियन्स लीगडब्ल्यूडब्ल्यूईबुंदेस्लिगायूएफसी यासारख्या खेळांपासून ते स्कॅम १९९२ द हर्षद मेहता स्टोरीमहारानीरॉकेट बॉईजगुल्लक यासारखे ओरिजिनल्सगार्गी सॅल्यूटकानेक्कानेशांतीत क्रांती आणि जेम्स हे क्षेत्रीय भाषांमधील शोजद गुड डॉक्टरअक्युज्डलकी हँकअ डिस्कव्हरी ऑफ विचेस यासारखे आंतरराष्ट्रीय शोजएव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ऍट वन्सद व्हेल यासारखे ऑस्कर विजेते सिनेमे असा विविधरंगी व विविधढंगी कन्टेन्ट सोनी लिववर उपलब्ध असल्याने वेगवेगळ्या आवडीनिवडी असणाऱ्यावेगवेगळ्या वयोगटातील युजर्सना मनोरंजनासाठी हे ऍप हवेहवेसे वाटेल असे आहे.

आपल्या युजर्सना अनलिमिटेड डेटाचा खरा अनुभव मिळवून देणाऱ्या ‘वी’च्या नवीन ३६८ आणि ३६९ रुपयांच्या रिचार्जेसच्या पोर्टफोलिओमध्ये कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता २०० जीबीपर्यंत वीकएंड डेटा रोलओव्हररात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट टाईम अनलिमिटेड डेटा हे देखील लाभ मिळतात.

इतकेच नव्हे तरया रिचार्ज प्लॅन्ससोबत ‘वी’ एमटीव्ही ऍपची व्हीआयपी सबस्क्रिप्शन देखील मिळते. ‘वी’ एमटीव्ही अर्थात ‘वी’ मुव्हीज अँड टीव्ही ऍप आणि ‘वी’ ऍपवर अतिशय उत्तम कन्टेन्टची विशाल लायब्ररी उपलब्ध आहे. ‘वी’ एमटीव्हीमध्ये ४५० पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्सलोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनेल्स आहेत. त्याशिवाय शेमारूलायन्सगेटझी५अतरंगीहंगामा प्लेडिस्कव्हरी आणि इतरही अनेक प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा ऍक्सेस याठिकाणी मिळतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...