झुंजार संपादक बबन कांबळे यांच्या निधनाने आंबेडकरी पत्रकारितेचा सम्राट हरपला – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

Date:

 मुंबई दि. 8 – दैनिक वृत्तरत्न सम्राट चे संपादक बबन कांबळे यांच्या दुःखद निधनाची वार्ता कळताच मला धक्का बसला. निष्पक्ष निडर झुंजार  पत्रकार विचारवंत मार्गदर्शक म्हणून बबन कांबळे यांचे योगदान मोठे असून त्यांच्या निधनाने आंबेडकरी पत्रकारितेचा सम्राट हरपला आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत संपादक बबन कांबळे यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

 पत्रकार संपादक दिवंगत बबन कांबळे  यांनी भारतीय दलित पँथर च्या चळवळीला पाठिंबा दिला. वरळी मध्ये ते राहत असताना भारतीय दलित पँथरमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन पँथर म्हणून त्यांनी काम केले. ते नवाकाळ  मध्ये पत्रकार म्हणून काम करताना त्यांमी आपली पत्रकारिता गाजविली. पुढे त्यांनी स्वतंत्र वृत्तरत्न सम्राट हे दैनिक सुरू केले. ज्या चळवळीला स्वतःचे हक्काचे वृत्तपत्र नसते ती चळवळ पंख तुटलेल्या पक्षा प्रमाणे असते हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आत्मसात करून बबन कांबळे यांनी आंबेडकरी चळवळीला आपले वृत्तपत्र मिळवून देण्याचा निर्धाराने दैनिक सम्राट हे वृत्तपत्र सुरू केले. संपूर्ण महाराष्ट्रात या वृत्तपत्राला वाचक लाभले. बबन कांबळे हे सम्राट ला आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र करण्यात यशस्वी झाले. त्यांचे हे ऐतिहासिक योगदान आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची कधीही भरून येणार नाही अशी  हानी झाली आहे अशी शोकभावना ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

दिवंगत बबन कांबळे यांच्याशी माझे जिवलग मैत्रीचे संबंध होते. त्यांच्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गावी ते मला दोन वेळा घेऊन गेले होते. त्यांनी आपल्या पत्रकारितेतून भारतीय दलित पँथर पासून आमच्या कार्यक्रमांना आंदोलनांना प्रसिद्धी दिली. माझ्या भूमिकेला वेळोवेळी पाठिंबा दिला.त्यांची अनेक विषयांवर माझ्याशी चर्चा  होत असे. बबन कांबळे आणि सम्राट चा माझे नेतृत्व वाढविण्यात मोठा वाटा राहिला आहे.आंबेडकरी चळवळीत सम्राट आणि बबन कांबळे यांचे अढळ आदराचे स्थान कायम राहील असे सांगत ना.रामदास आठवले यांनी दिवंगत बबन कांबळे यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

संपादक ज्येष्ठ पत्रकार बबन कांबळे यांचे आज सकाळी दि 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता ठाणे येथील खाजगी रुग्णालयात  वयाच्या 70 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी;  कुणाल आणि कृपाल दोन मुले आणि सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दि.8 फेब. रात्री 8 वाजता ना.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत ठाण्यातील बाळकुम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...