मुंबईतील रस्त्याची कंत्राटे देताना शिंदे सरकारकडून विकासाच्या नावाखाली घोळ; आदित्य ठाकरेंचा आरोप

Date:

पुण्यातील वेताळ टेकडी प्रकल्पावर देखील बोलले ठाकरे ….

मुंबई-शिंदे सरकारकडून विकासाच्या नावाखाली घोळ सुरू आहे. मुंबईतील रस्त्याची कंत्राटे केवळ 5 कंपन्यांना दिली. एकीकडे भ्रष्ट प्रशासन आणि सरकार मलिदा खात आहे आणि दुसरीकडे त्यांच्या हावरटपणाची फळे मुंबईकरांना भोगावी लागत आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.आज मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईतील रस्त्यांच्या कामासाठी शिंदे सरकारने जानेवारीत घाईघाईत वर्क ऑर्डर काढली. पालिकेत नगरसेवक नसताना मोठी कंत्राटे दिली गेली. मात्र, अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. ही कामे कधी सुरू होणार?, कुठे सुरू होणार?, याची माहिती मुंबई पालिकेला मिळणे अतिशय महत्त्वाची आहे.

आदित्य टाकरे म्हणाले, मुंबईतील रस्त्यांच्या कामांसाठी पालिकेने जवळपास 650 कोटींचे टेंडर दिले आहे. अजूनही कामे सुरूच नाहीत. सर्वसामान्यांचे पैसे अशा पद्धतीने बिल्डरांच्या घशात टाकले जात आहे. कामातील दिरंगाईबद्दल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे माजी नगरसेवक बंधू यांनीही नाराजी केली आहे. तसे पत्र त्यांनी दिले आहे. मुंबईतील सर्व वॉर्डांमधील कामे ठप्प आहेत. त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाराज आहेत. गद्दार गँग सोडली तर सर्वपक्षीयांमध्ये याबाबत नाराजी आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईतील रस्ते आणि पुलांची कामे खडीच्या पुरवठ्याअभावी ठप्प झाली आहेत. हे अतिशय धक्कादायक आहे. सीएम हे ‘करप्ट मॅन’ आहे. त्यांच्या निकटवर्तीयांपैकी काहींनी खडी पुरवठादारांवर दबाव आणून एकाच कंपनीकडून खडी घेण्यास भाग पाडल्याची सध्या चर्चा आहे. यामुळेच खडीचे दर 50 टक्क्यांहून जास्त वाढले असून परिणामी रस्ते पुलांच्या खर्चातदेखील वाढ होणार आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, जानेवारीत वर्क ऑर्डर देऊनही मुंबईतील कामे ठप्प आहेत. डिलाईल रोड पूल किंवा आणखी काही महत्त्वाच्या प्रकल्पांची पालिकेने हाती घेतलेली कामे आता 31 मेपूर्वी पूर्ण होणे अशक्य आहे. नवीन रस्त्यांच्या कामाच्या डेडलाईनबाबत मुंबई महापालिकेने मुंबईकरांना स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...