पुण्यात एकदा घेतली होती फडणवीसांची भर उन्हात सभा पण … ५ पुणेकर हि नव्हते फिरकले सभेला ;सभा रद्द करून फडणवीस फिरले होते सभास्थळावरून माघारी …
दिवसभर वाजविली जाणारी कल्हई ..माध्यमातून वाजली का नाही ?
मुंबई- महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाचा ‘ग्रॅँड इव्हेंट’ करून डाॅ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लाखो शिष्यांची व्होट बँक खेचून घेण्याच्या उद्देशाने शिंदे-फडणवीस सरकारने या सोहळ्याचा उन्हाची आणि त्याच्या तीव्रतेची परवा न करता घाट घातला. आजवर हा सोहळा मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत होत असे. मात्र यंदा सरकारने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व लाखो श्रीसेवकांना आमंत्रित केले. कोट्यवधींचा खर्च केला. पण गालबोट लागल्यानंतर मात्र भाजप नेत्यांनी मौन धारण केले. जे सांस्कृतिक मंत्रालय आयोजक होते त्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार जबाबदारी घेण्यासही पुढे आले नाहीत. उलट पालकमंत्री उदय सामंतांना प्रेससमोर उभे करून जनक्षोभ शिंदे गटाकडे वळवण्याची खेळी भाजपने खेळली.
१५ एप्रिलपासून उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा आपत्ती व्यवस्थापन खात्याने दिला होता तरीही सरकारने भरदुपारी मैदानावर कार्यक्रम का केला, असा प्रश्न आहे. दरम्यान, अमित शाह यांंच्या गोवा दौऱ्यामुळे सर्वांना वेठीस धरले असा विरोधकांचा आरोप आहे. तर श्रीसदस्यांना वेळीच घरी जाता यावे म्हणून व अप्पासाहेबांच्या सूचनेनुसार कार्यक्रम दुपारी घेतला, असा दुसरा दावा करण्यात आला.तर अचानक तापमान वाढल्याने दुर्घटना घडल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.
ज्येष्ठ निरूपणकार डाॅ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघाताने बळी गेलेल्या श्रीसदस्यांची संख्या १३ वर गेली. रविवारी दुपारी खारघरच्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर ३८ अंश तळपत्या उन्हात लाखो अनुयायी ५ ते ६ तास तिष्ठत बसले होते. त्यापैकी ११ जणांचा उष्माघातामुळे रविवारी मृत्यू झाला होता, तर सोमवारी आणखी दोघांची प्राणज्योत मालवली.
1. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम २५ लाख केली आहे. मात्र पुरस्कार वितरण सोहळ्यात सरकारने १३ कोटी खर्च केले.
2. व्हीआयपी पाहुण्यांसाठी स्टेजवर मंडप, कूलर्स लावले होते. प्रेक्षक अनुयायांसाठी मात्र मंडप नव्हता, ते उन्हातच तळपले.
3. मोबाइल शौचालयेही दूरवर होती, गर्दीत तिथे जाणे जिकिरीचे होते म्हणून प्रेक्षक पाणी कमी पिले, त्यामुळे उन्हाचा फटका.
4. लाखोंच्या संख्येने लोक आल्याने चेंगराचेंगरीही झाली. सरकारने ते लपवून ठेवले. काही मृत व रुग्णांच्या अंगावरील जखमांवरून ते आता समोर आले आहे.
5. सविता पवारचा (मंगळवेढा) मृत्यू उष्माघाताने नव्हे, चेंगराचेंगरीत झाल्याचे त्यांचे भाऊ सचिन घुले यांनी सांगितले.
मृतांची नावे : महेश नारायण गायकर (४२, मुंबई), जयश्री जगन्नाथ पाटील (५४, रायगड), मंजूषा कृष्णा भोंबडे (५१, मुंबई), स्वप्निल सदाशिव केणी (३०, विरार), तुळशीरामभाऊ वांगड (५८, पालघर), कलावती सिद्राम वायचळ (४५, सोलापूर), संगीता संजय पवार (४२, मंगळवेढा, सोलापूर), भीमा कृष्णा साळवे (५८, ठाणे). इतरांची ओळख पटलेली नाही.

