मुंबई-
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान श्रीसेवकांच्या झालेल्या मृत्यूवर आरोप प्रत्यारोप होत असताना निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
ते म्हणाले, श्री सेवकांचा परिवार देशभर पसरला आहे. काल घडलेला प्रकार अतिशत दुर्दैवी आहे. त्याचं राजकारण करु नका. हे संकट माझ्या कुटुंबावर आलेलं संकट आहे. श्री सदस्यांची एकमेकांसोबत राहण्याची परंपरा आहे. माझे दुःख हे व्यक्त करण्यापलीकडचे आहे. आम्ही कायम आपद्ग्रस्तांसोबत आहोत, अशी प्रतिक्रीया आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.


