पुणे-काश्मीरमधील पुलवामा येथे आपल्या ४० जवानांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. ते भाजपाच्या विचाराचे होते. भाजपानेच त्यांनी नियुक्त केली होती. आता राज्यपालपदाची मुदत संपल्यानंतर त्यांनी खरी परिस्थिती सांगतील. आपल्या सैन्याला एअरक्राफ्ट आणि आवश्यक ती साधनं वेळेवर न दिल्याने ही घटना घडली. तसेच पंतप्रधांनी त्यांना या विषयावर शांत राहायला सांगितल्यांचही, ते म्हणाले. ही सत्य परिस्थिती होती, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे .आपल्या सैनिकांचं रक्षण करण्याची जबाबदारी केंद्रातील भाजपा सरकारवर आहे. मात्र, सरकार ही जबाबदारी घ्यायला तयार नसेल, तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीका ही त्यांनी केली.
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत पुलवामा हल्ल्यावरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान, मलिकांच्या या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

