पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयाच्या हेरीटेज क्लब च्या वतीने शाहू, फुले, आंबेडकर आणि आजची तरुण पिढी या विषयावर प्रा.यशवंत गोसावी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे, प्रा.यशवंत गोसावी, हेरीटेज क्लब च्या समन्वयक प्रा.रमा गायकवाड यांचे उपस्थित फुले, शाहू, आंबेडकर यांचे प्रतिमेस अभिवादन करून झाली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.यशवंत गोसावी यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांना अपेक्षित असणारा आदर्श समाज घडवायचा असेल तर आज आजच्या तरुणाईने त्यांच्या विचारांचे अनुकरण करून परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सक्रीय सहभाग घेतला पाहिजे असे आवाहन या प्रसंगी केले. दुर्दैवाने आज समाजामध्ये फुले-शाहू-आंबेडकरांनी दिलेल्या समतेच्या विचारांची जो-तो त्याच्या सोयीनुसार फोड करतो आहे. डावे, उजवे,पुरोगामी, प्रतिगामी वाद अजूनही होत आहे. माणूस’ म्हणून माझ्या तुमच्यातील दरी मिटल्याशिवाय या, समतेची पहाट उजाडणार नाही. जात – पात असा भेदभाव न करता भारतीय होऊन माणुसकीचा धर्म पाळा. आजच्या तांत्रीक युगातील तरुण युवा पिढी अनावश्यक रूढी परंपरा जोपासत स्वतःला हायटेक समजण्याच्या अनामिक हुरहूरीतून बेरोजगारी, व्यसनाधीनता याकडे वळत आहे.ज्या कार्यासाठी आपला माणूस म्हणून जन्म झाला त्याकडे पाहून चिंतन करण्याकडे मात्र कुणीही पुढाकार घेत नाही. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचारच आजच्या तरुणाईला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात असे प्रतिपादन प्रा.यशवंत गोसावी यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली हेरीटेज कल्बच्या समन्वयक प्रा.रमा गायकवाड यांनी या व्याख्यानाचे आयोजन केले होते. या व्याख्यानासाठी प्रा.यशवंत गोसावी, प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे, हेरीटेज कल्बच्या समन्वयक प्रा.रमा गायकवाड, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रांजली मोरे यांनी केले. आभार कु.रचना पाटील हिने मानले. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा.सौ. प्रमिला गायकवाड यांनी महाविद्यालयाने हेरीटेज क्लबच्या माध्यमातून हे व्याख्यान आयोजित केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.

