PMPML बस प्रवासात ८० हजाराची सोन्याची पाटली मनगटातून लांबविली

Date:

पुणे- पुण्यातील चोऱ्या माऱ्या ,गुन्हेगारी आधुनिक तंत्राच्या काळातही कमी होण्याचे नाव घेइनाशी झाली आहे. pmpml बसचा प्रवास , बसमधील गर्दी रोज कुणा न कुणाचा खीस लीलया कापत आहे . काल संध्याकाळी पावणेपाच वाजता पुणे महानगरपालिका बस थांब्यावर मुकाई चौक बस मध्ये ब्चाध्त असतांना गर्दीचा फायदा घेऊन कुणा भामट्याने ६१ वर्षाच्या वृद्धेच्या हातातील ८० हजार रुपये किमतीची सोन्याची पाटली लीलया लांबविली .पोलीस अंमलदार मेमाणे 9662220414 या भामट्याचा शोध घेत आहेत .

वर्गणी न देणाऱ्यांना मारहाण करणारे ४ धटिंगण गजाआड

समर्थ पोलिसांनी रास्ता पेठेतील उबेद कादरभाई चौकातील एका मोबाईल शॉपी मालकास ईद ची वर्गणी दिली नाही म्हणून मारहाण करून पळून जाणारे चार धटिंगण गजाआड केले आहेत . अमान इब्राहीम खान वय २१ ,हमजा तस्वर शेख वय अवघे १९ ,हुजेफा इसक शेख वय २१ ,आणि मोहम्मद वासिम खान वय अवघे १९ सर्व राहणार सत्तर चाल नाना पेठ अशी या चार गुंडांची नावे आहेत . एवढ्या कमी वयात असे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्याना वेळीच पकडण्याचे उद्दिष्ट्य समर्थ पोलिसांनी ठेवले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...