वानवडी स.नं.६४ येथील अनधिकृत होर्डिंग व बेकायदेशीर राडारोडा काढण्यासाठी आंदोलन

Date:

पुणे-वानवडी स.नं.६४ येथील अनधिकृत होर्डिंग व बेकायदेशीर राडारोडा काढण्यासाठी येथे महापालिकेच्या प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्षप्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनामध्ये माजी नगरसेविका सौ.रत्नप्रभाताई जगताप, माजी नगरसेविका सौ नंदा नारायण लोणकर, माजी नगरसेवक अशोक कांबळे, प्रफुल्ल जांभुळकर, श्री. केविन मॅन्युअल, प्रीती चड्डा, सौ. मृणालिनीताई वाणी, संदीप जगताप , सौ. स्वाती चिटणीस, गणेश नायडू व वानवडी परिसरातील तसेच सोसायटीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.या आंदोलकांचे निवेदन वानवडी रामटेकडी, क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्याम तारू यांनी स्वीकारले.

राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी सांगितले कि ,’वानवडी सर्वे नंबर ६४ या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे प्ले ग्राउंड, पार्किंग, HCMTR – रिंग रोड अशा विविध बाबींकरिता आरक्षण आहे. या आरक्षणाच्या जागेमध्ये मागील २०दिवसात तब्बल १५ होर्डिंग्स अनाधिकृतपणे उभी केलेली आहेत. क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणून,धमक्या देऊन अशाप्रकारे हे होर्डिंग उभे केलेले आहेत, असा आमचा थेट आरोप आहे. याबाबत प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, ही कारवाई करावी याकरिता तसेच मार्केट यार्ड परिसरातील विविध बिल्डरचा राडारोडा या ठिकाणी टाकून पुराची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्या विरोधामध्ये आज आंदोलन करण्यात आले, हे जनआंदोलन करण्यात येत असताना पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या काही दिवसांमध्ये कारवाई केली नाही तर त्यांना थेट न्यायालयात खेचण्याचा इशारा देण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...