पुणे- वाढती महागाई , बेरोजगारी यांचे चटके जनतेला एकीकडे बसत असताना शहर आणि परिसरात खंडणी मागणे चोऱ्या करणे अशा स्वरूपाच्या गुन्हेगारीला ऊत आला आहे . पीएमपीएमएल च्या बस ने प्रवास करणाऱ्या एका युवकाची दीड लाखाची चेन हातोहात चोरट्याने लांबविली तर २८ वर्षीय युवकाला व्हाटसअप कॉल करून २५ हजाराची खंडणी मागितली आणि ७६ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ३५ हजाराची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेल्याच्या प्रकरणी पुण्याच्या अनुक्रमे सहकारनगर, विमान नगर आणि विश्रामबाग पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवी पेठेतील लोकमान्यनगर कॉलनीत संध्याकाळी साडेसहा वाजता फेरफटका मारणाऱ्या ७६ वर्षीय आजींच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी हिसका मारून पळवून नेली शहराच्या मध्यवस्तीत अंधार पडायच्या आत अशी घटना घडल्याने चिंतेचे वातावरण आहे विश्रामबाग पोलीस अधिकारी संजय निकुंभ 9923604514 याप्रकरणी तपास करत आहेत.
२५ वर्षीय साकिब सादिक शेख (रा. लेन नं.१ ,कर्म भूमिनगर,लोहगाव ) या तरुणाला विमान नगर पोलिसांनी २५ हजाराची खंडणी मागितली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी अटक केली आहे.रात्री साडेअकरा ते पाहते पावणेचारच्या दरम्यान २८ वर्षीय विमान नगर येथे हॉटेल व्यवसाय असणार्या युवकाला व्हाटसअप कॉल करून जीवे मारण्याची धमकी देत २५ हजाराची खंडणी मागितली असा त्याच्यावर आरोप आहे.
प्रदीप मुरकुटे (वय ३२, रा. दत्तनगर जांभूळ वाडी रोड, कात्रज ) हा युवक भर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा रस्त्यावरून पीएमपीएमएल च्या बस ने प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात भामट्याने त्याच्या पँट च्या मागील खिशातील पाकीट मारले ज्यात दीड लाख रुपये किंमतीची हिरे जवाहिरे असलेली सोन साखळी होती.या प्रकरणी भामट्याचा शोध सहकारनगर चे फौजदार राहुल खंडाळे 9552635151 घेत आहेत . पीएमपीएमएलच्या बस ने मूल्यवान वस्तू किंवा रोकड घेऊन प्रवास करणेही किती धोक्याचे झाले आहे हे अशा वाढत्या घटनांवरून दिसून यते आहे.अशीच एक घटना हडपसरच्या गाडीतळावर देखील घडली आहे येथे ६० वर्षीय वृद्धा सासवड च्या बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात भामट्याने त्यांच्या गळ्यातील २२ हजाराचे सोन्याचे डोरले हातोहाथ लांबविले .पोलीस अंमलदार सुजाता गायकवाड 9763728147 या भामट्याचा शोध घेत आहेत .
लोकमतचे गठ्ठे हि पळविले
लक्ष्मीनारायण सिनेमागृहाजवळ पहाटे लोकमत या वृत्तपत्राच्या पुरवणीचे १३ बंडल वितरणासाठी नेहमीप्रमाणे टाकले असताना अज्ञात भामट्याने तेही पळविले .

