विकास पोळ, रोहिणी टिळक भिमथॉन स्पर्धेचे विजेते.

Date:

पुणे : डॉ. आंबेडकर यांचे विचार समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचवण्यासाठी तसेच सामाजिक एकता आणि समानतेचा संदेश देणार्‍या मॅरेथॉनच्या धर्तीवर आधारित  भिमथॉन स्पर्धेतील पुरुष गटात पहिला येण्याचा मान विकास पोळ यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक दीपक कुंभार व तृतिय क्रमांक इमताज मोनदल यांना मिळाला. १८ वर्षाखालील गटात संदीप यादव, प्रताप कदम आणि आदित्य पायाळ विजयी ठरले. महिला खुल्या गटात रोहिणी टिळक, रुषिका कुळे व अर्पिता शिंदे विजयी ठरल्या. १८ वर्षाखालील युवती गटात निशा पासवान, देवकी आणि रिया धावरे यांनी विजयाचा मान पटकावला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमथॉन स्पर्धेचे आयोजन स्पार्क फौंडेशनचे किशोर कंबळे, माय अर्थ फाउंडेशचे अध्यक्ष अनंत घरत यांनी केले. ७ किलोमीटर अंतर असलेली ही स्पर्धा सारसबाग जवळील सणस मैदानापासून सुरु होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन येथे समारोप झाला. महिला, पुरुष व १८ वर्षाखालील युवा गटात लढत झाली. मोठ्या संख्येने नागरिकांनी या स्पर्धेत भाग घेतला व मॅरेथॉन ची शोभा वाढवली. विजेत्यांना ट्रॉफी सर्टिफिकेट व मेडल देण्यात आले व सर्व स्पर्धकांना सर्टिफिकेट आणि मेडल देण्यात आले.

या मॅरेथॉनला पुणे जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अभय छाजेड, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तर सूत्रसंचालन ऍड. आकाश साबळे यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...