डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतून कायद्याचे राज्य निर्माण केले – प्रा. प्रकाश पवार  

Date:

पुणे, दि. १४ एप्रिल २०२३: रक्ताचा एक थेंबही न सांडवता आणि हिंसेला कुठेही स्थान न देता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षांची गुलामगिरी संपुष्टात आणली. भारतातील प्रत्येक माणसाला जगण्याचा समान अधिकार व मूलभूत हक्कांचे स्वातंत्र्य लोकशाहीच्या माध्यमातून बहाल केले आणि ते अबाधित ठेवण्यासाठी राज्यघटनेतून कायद्याचे राज्य निर्माण केले असे प्रतिपादन ज्येष्ठ वक्ते व फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रकाश मारूती पवार यांनी शुक्रवारी (दि. १४) केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरण व महापारेषणमधील उत्सव समितीच्या वतीने रास्तापेठ येथे आयोजित कार्यक्रमात प्रा. प्रकाश पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार तर व्यासपीठावर अधीक्षक अभियंता सर्वश्री सतीश राजदीप, सतीश गायकवाड, जयवंत कुलकर्णी, प्रमोद भोसले यांची उपस्थिती होती.

प्रा. प्रकाश पवार म्हणाले की, ‘भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने भारताची एक प्रजासत्ताक व सार्वभौम राष्ट्र म्हणून उभारणी केली. समता प्रस्थापित केली. धर्म, पंथ, जातीपातीला थारा न देता आम्ही सर्व भारताचे लोक अशी प्रत्येकास नवी ओळख दिली. प्रत्येकास समान अधिकार व हक्क दिले.’ यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले, की ‘भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या ज्ञानसंपन्नतेच्या जोरावरच भारताचा आर्थिक व सामाजिक विकास झाला आहे. प्रगती झाली आहे. विविध क्षेत्रातील उत्तुंग भरारीसाठी योग्य दिशा मिळाली आहे. त्यांच्यामुळेच तळागाळातील सर्वसामान्य माणूस मानसिक गुलामगिरीतून मुक्त झाला आहे.’ डॉ. आंबेडकर यांनी विविध क्षेत्राचे अभ्यासक व तज्ज्ञ म्हणून देश उभारणीत दिलेल्या ऐतिहासिक योगदानाची माहिती यावेळी मुख्य अभियंता श्री. पवार यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बाबासाहेब शिंदे यांनी केले तर श्री. भरत मुंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महावितरण व महापारेषणचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनासाठी सर्व कर्मचारी संघटनांच्या संयुक्त उत्सव समितीने पुढाकार घेतला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...