अजित पवारांविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी-कारवाईची राष्ट्रवादीकडून मागणी

Date:

पुणे-अजित पवारांविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असून त्याच्या गुन्हेगारी कृत्यावर कारवाई कारवाई अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने पुण्याच्या पोलीस आयुक्तांना समक्ष निवेदन देऊन केली आहे . यासंदर्भात राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि,’भाजपचा शिवाजीनगर अध्यक्ष रवींद्र साळेगावकर याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विषयी एक तक्रार दिलेली आहे. सदर इसम हा राजकीय कार्यकर्त्याच्या वेशातील एक गुंड प्रवृत्तीची व्यक्ती असून काही वर्षांपूर्वी या व्यक्तीला खुनाच्या आरोपांमध्ये अटक केलेली होती, तसेच तो काही वर्ष जेलमध्ये सुद्धा जावून आलेला आहे .त्याचा कब्जा असलेल्या ज्या जमिनीचा सदर ईसमाने उल्लेख केलेला आहे ती जमीन गोयल नामक व्यक्तीची आहे व त्यात अजितदादांचा दूरवर कोणताही संबंध नाही ,गुन्हेगारी क्षेत्रात आपले वर्चस्व वाढवण्याकरिता व एका लोकप्रिय नेत्यावरती आपण काही आरोप केले तर त्यातून प्रसिध्दी मिळून आपल्या वरिष्ठांना खुश करण्याकरिता त्याने अजितदादांवरती आरोप केले आहेत.सदर इसम हा वेगवेगळ्या गुन्हेगारी कूत्यात सहभागी असुन दोन महीण्यांपुर्वी आत्महत्या केलेल्या भूषण शंकर शिंदे यांच्या व त्यांच्या वडिलांच्या मुत्यूस कारणीभूत असल्याचा दाटसंशय आहे , सदर प्रकरणाचा अत्यंत काटेकोरपणे तपास होवून दोशी व्यक्तिस कडक शासन होण्याकरीता आपणाकडून योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेशकुमार यांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख ,उदय महाले , संदीप बालवडकर , दिपक कामठे , शशिकांत जगताप यांच्या शिष्टमंडळाने केली

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...