Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शिवाजी महाराजांवरील ‘रणखैंदळ’ हा ‘महासम्राट’ कादंबरीमालेचा द्वितीय खंड २० मे रोजी प्रकाशित होणार.

Date:


श्री विश्वास पाटील यांच्या दमदार लेखणीतून उतरलेली ही आणखी एक जबरदस्त ऐतिहासिक कादंबरी ठरणार आहे. त्याचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस करत आहे. कादंबरीच्या प्रसिद्धी पूर्व नोंदणी सुरू झाली आहे.
‘महासम्राट’च्या दुसऱ्या रणखैंदळ कादंबरीखंडाची सुरूवातच मुळी नेताजी पालकरांनी विजापुरच्या अजिंक्य अशा तटबंदीच्या भिंतीवर धडक देऊन कसा चिवट हमला चढवला होता हया प्रसंगाने सुरू होते. पुढे 1685 मधे औरंगजेबाने आपल्या तीन लाख फौजेला सोबत घेऊन विजापुरच्या याच तटबंदीवर आक्रमण केले होते. परंतु जवळपास बारातेरा महिने या अंजिक्य भिंतीने औरंगजेबाच्या महाफौजेला सुध्दा दाद दिली नव्हती, मात्र 10 नोव्हेंबर 1659 ला प्रतापगडाच्या पायथ्याला शिवरायांनी अफझलखानाला फाडला होता. त्यानंतर राजांच्या आदेशानुसारच फक्त पाचसात हजाराची फौज घेऊन चौथ्या दिवशी नेताजी पालकरांनी विजापुरच्या अजिंक्य दरवाजाला टक्कर दिली. त्या शहरामधे हाहाकार उडवला होता. एखादया महाकाव्यात शोभावा असाच हा कल्पीत नव्हे तर सत्यप्रसंग. जेव्हा तो ‘पानिपतकारांच्या लेखणीतून वाचक वाचतील तेव्हा नक्कीच त्यांच्या अंगावर शहारे खडे होतील.
या शिवाय पन्हाळयाच्या वेढयात शिवराय एकशे तेहत्तीस दिवस कसे अडकले. त्यांनी सहयाद्रीतील अत्यंत दुर्धर अशा जंगली वाटेने एखादया धाडसी शेतकऱ्याच्या चिकाटीने दीड दिवसांत घोडखिंड व विशाळगड हा सुमारे साठ किमीचा टप्पा पायी प्रवासाने कसा गाठला. या प्रवासात राजांनी पालखी किंवा घोडा वापरला नव्हता. कारण ही जंगली वाट इतकी दुरास्पद आहे की, आजही या मूळ रस्त्याने रिकामा घोडा सुध्दा जाऊ शकत नाही. पालखी तर नाहीच नाही. ती फक्त शिवा काशिदासाठी मुददाम वापरली गेली होती. स्वतः लेखक श्री. विश्वास पाटील यांनी गेली अनेक वर्ष या वाटेने त्याच तिथीला भर पावसात पायी प्रवास केला आहे.
हिंदवी स्वराज्यासाठी पन्हाळयाच्या रानात हौतात्म्य पत्करलेले रणवीर शिवा काशिद तसेच पहिला जबरदस्त इस्लाम धर्मीय हुतात्मा बांधव सिध्दी वाहवाह तसेच पावनखिंडीला पावन करणारे बाजीप्रभु व फुलाजी यांची वीरकहाणी यामधे आहेच. परंतु मराठ्यांच्या इतिहासात पुढे किर्ती पावलेल्या धनाजी व संताजी पैकी धनाजी जाधवांचे वडील शंभुजी जाधव यांनीही पावनखिंड लढवताना प्राणाची बाजी कशी लावली होती, शिवकाळातली असे अनेक अभुतपूर्व प्रसंग व विलक्षण व्यक्तिचित्रे श्री पाटील यांनी आपल्या संशोधनाच्या बळावर वाचकांच्या समोर आणली आहेत.
शिवापट्टणम ते पर्नाल पर्वतापर्यंतच्या शिवरायांच्या बहाद्दुर सहकाऱ्यांच्या घोडदौडी, वेंगुर्ला राजापूर, जैतापुराकडील सागरखाड्यांकाठचा रंगलेला रणरंग, सुरत नावाच्या सुवर्ण नगरीची शिवरायांनी केलेली महालुट, हिंदवी स्वराज्याच्या हितासाठी शिवराय व त्यांचे पिताजी या दोघांमधे झालेली सक्तीची ताटातुट व बावीस वर्षांच्या दुराव्यानंतर त्या पितापुत्रात जेजुरी गडावर खंडेरायाच्या प्रांगणात घडून आलेली विलक्षण भेट. उंबरखिंडीच्या रानात झाडापहाडाआड शिवरायांनी लपवलेले फक्त दोन हजार सैनिक आणि त्यांच्या बळावर कार्तलबखान व रायबागीनीच्या सव्वीस हजार फौजेची उडवलेली दाणादाण व त्यांना निशस्त्र करून पळवून लावण्याचा केलेला महाप्रराकम अशा अनेक सत्य परंतु अद्भुत अशा घटनांनी ‘रणरौंदळ’ ही कादंबरीच एका अखंड विलक्षण महायुध्दासारखी कागदावर उतरलेली आहे.
5 नोव्हेंबर 1664 या दिवशी शिवरायांनी कुडाळचे महायुध्द जिंकले. यामधे विजापुरचा तत्कालीन वजीर खवासखान याला त्यानी अखेरीस अक्षरशः पळवून लावले होते. खेमसावंतांच्या दहा हजार फौजेची दाणादाण उडवली होती. वडीलांच्या मृत्युनंतर अवघ्या वर्षभरात शत्रुच्या संगतीने आपल्या विरोधात रणामधे उतरलेल्या आपल्या सावत्र बंधु व्यंकोजीराजांना पाहण्याचे दुःख व दुर्दैवही सोसले होते. त्यानंतर फक्त वीसच दिवसांनी सागराच्या पोटातील शिवलंका ठरलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाया भरणीला सुरुवात केली. जगातील अलेक्झांडर द ग्रेट तसेच नेपोलियन बोनापार्ट इत्यादी जगजेत्त्या वीरासारखी शिवरायांच्या ठायी किती जिदद आणि उर्जा होती. त्यांच्या रूपाने एका वेळी नऊ माणसाचे काम एकटे शिवराय कसे उरकत होते. एक व्यक्ती म्हणूनही शिवरायांच्या हया अजोड व्यक्तिमत्वाचा श्री. पाटील यांनी आपल्या लेखणीद्वारे दीर्घ धांडोळा घेतला आहे.
‘महासम्राट’च्या झंझावात या पहिल्या खंडामधे हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाची संकल्पना मांडणारे शिवरायांचे महापिता शहाजीराजे भोसले यांचे व मातोश्री जिजाऊसाहेब या दोघांची विराट व्यक्तीचित्रे कादंबरीकार श्री. पाटील यांनी रेखाटलेली आहेत. ज्यामधे शहाजीबाबांनी औरंगजेबाचा बाप शहाजहान व आजोबा जहांगिर या दोन मुघल पातशहांच्या लाखो सैनिकांच्या विरोधात उघडया रणमैदानात तलवार कशी गाजवली होती, हा सत्त्याधिष्ठीत पण आजवर दुर्लक्षित केलेला सारा काळ वाचकांच्या डोळ्यांसमोर उभा केला आहे. शिवाय जिजाऊसाहेबांच्या वडीलांसह माहेरातील चार कर्त्या पुरूषांची हत्त्या करून निजामाने एक प्रकारे त्यांचे माहेरच कसे उध्वस्त केले होते. त्याच वेळी विजापुरकरांनी त्यांचे सासर म्हणजेच पुण्याच्या जहागिरीवर कसा गाढवाचा नांगर फिरवला होता. त्याच वर्षी शतकांच्या पोटातून उगवणाऱ्या महादुष्काळाने रयतेला कसे पिडले होते. नेमक्या या काळात शिवरायांच्यावेळी जिजाऊसाहेब गर्भारशी होत्या. अशा खतरनाक अस्मानी आणि सुलतानी संकटामधे शहाजीबाबा व जिजाऊसाहेबांनी शिवरायांना कसे घडवले, वाढवले हा सारा 1620 ते 1659 पर्यंतचा चाळीस वर्षांचा कालखंड झंझावात हया पहिल्या भागामधे उतरला असून देशभरातील वाचकांच्या तो पसंतीस पडला आहे. त्यामुळेच या मालेतील द्वितीय खंडाची वाचकांकडून वारंवार मागणी केली जात होती.
मराठीमधे गेल्या पाचसहा महिन्यात महासम्राट या खंडाच्या सुमारे तीस हजार प्रती संपल्या आहेत. या शिवाय ही कांदबरी मराठी बरोबरच हिंदी (राजकमल प्रकाशन दिल्ली) कन्नड (सपना बेंगलोर), इंग्रजी महासम्राट शिवाजी’ (वेस्टलैंड दिल्ली) या भाषांमधेही प्रकाशित झाली असून ती अनेक भाषांमधे बेस्ट सेलर ठरली आहे.
‘महासम्राट’च्या द्वितीय खंडासाठी आतुर झालेल्या वाचकांना ही दुसऱ्या रणखैंदळ मेजवाणी नव्हे तर सर्व भारतीयांसाठी स्फुर्तीगाथा ठरावी अशी ही कहाणी मे महिन्याच्या मध्यावर उपलब्ध होत आहे. पहिल्या खंडाप्रमाणेच तो चिरंतन वाड.मयाचा भाग ठरेल याची खात्री आहे.
मूळ 625 रुपये किमतीची ही कादंबरी आता वाचकांना आगाऊ नोंदणीमध्ये फक्त 480 रुपये उपलब्ध होणारा असून तिचे धुमधडाक्यात ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. वाचकांना ती खालील संकेतस्थळावर उपलब्ध होईल www.mehtapublishinghouse.com. तसेच sales@mehtapublishinghouse.com ती ॲमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहे. तरी वाचकांनी या संधीचा तात्काळ लाभ घ्यावा.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...