पुणे- २० रुपयात कलाकंद येत नाही किमान ७० रुपये लागतील असे सांगणाऱ्या स्वीट होमच्या मालकाचा राग आल्याने एका ३२ वर्षीय तरुणाने पुन्हा याच स्वीट होम मध्ये जाऊन त्यावर हत्यार उगारून धमक्या देत दहशत निर्माण केल्याने ३२ वर्षाच्या युव्कार सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. बालाजीनगर मधील राज्विहार सोसायटीत असलेल्या स्वीट होम मध्ये दुपारी दीड वाजता हि घटना घडली .अजय राजू मोगरे (लोअर इंदिरानगर गल्ली नंबर १ ,बिबवेवाडी )असे याप्रकरणी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. अजय मोगरे हा सकाळी या दुकानात गेला होता अगोदर त्याने पावशेर ढोकला घेतला आणि त्याचे पैसेही दिले .त्यानंतर त्याने २० रुपयाचा कलाकंद मागितला पण त्यावेळी कमीत कमी अर्धापाव घ्या ७० रुपयाचा असे दुकान मालकाने सांगितल्याने या युवकाची सटकली . आणि दुकान मालकाबरोबर वाद घालून त्याच्या अंगावर पैसे फेकून तो निघून गेला त्यानंतर तो दुपारी पुन्हा दीड वाजता दुकानात आला.आणि त्याच्याकडील लोखंडी हत्यार काढून काऊंटरवर मारून ,तुम्हाला लई माज आहे . एकेकाला मारून टाकतो असे बोलत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला . यावेळी दुकानातील अन्य ग्राहकाने पोलिसांना फोन करून बोलावून घेतले आणि या युवकास अटक केली .पोलीस अंमलदार इंगळे 7720074663 अधिक तपास करत आहेत .
२० रुपयास कलाकंद येत नाही म्हणणाऱ्या स्वीट होम मध्ये दहशत माजवू पाहणाऱ्या तरुणास अटक
Date:

