वासंतिक चंदन उटीनिमित्त दत्तमंदिरात भजनसंध्या

Date:

 श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आयोजन
पुणे : ज्ञानियांचा राजा गुरु महाराव…विठू माऊली तू… अशा विविध अभंगांच्या गजरात दत्तमहाराजांच्या मूर्तीला चंदन उटीचा लेप लावण्यात आला. टाळ-मृदुंगांचा गजर आणि मोग-याच्या सुवासिक फुलांचा गंध अशा वातावरणात भारतीय वारकरी मंडळाने सादर केलेल्या भजनांनी दत्तमंदिराचा परिसर दुमदुमून गेला. 
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे वासंतिक चंदन उटीनिमित्त भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल यांसह ज्ञानदेव म्हणजे विठोबा आमचा पाठीराखा… या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाला पुणेकरांनी टाळयांच्या गजरात साथ दिली. तर तुकाराम तुकाराम नाम घेता… यांसारखे अभंग आणि दत्तनामाचा गजर करताना उपस्थितांमध्ये भक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. 
अ‍ॅड.प्रताप परदेशी म्हणाले, दत्तमंदिरात वासंतिक चंदन उटीचे दरवर्शी आयोजन केले जाते. यानिमित्ताने भारतीय वारकरी मंडळातर्फे भजनाच्या कार्यक्रम देखील घेण्यात आला. भारतीय वारकरी मंडळाच्या वारक-यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात भजन  सादरीकरण केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...