पुणे- महिलांच्या जीवनात पुरुषांच्या असण्या वा नसण्याने कोणताही फरक पडू नये अशी स्त्री स्वातंत्र्याची उद्दिष्ट्ये असताना पतीच्या निधनानंतर स्त्रीला काऊ उपाध्या लावाव्यात यावरून सुरु असलेला प्रवाह निरर्थक आहे आणि स्त्री स्वातंत्र्यावर प्रहर करणारा आहे म्हणून याच संदर्भात मंत्री मंगलप्रभात लोढा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा आम्ही निषेध करत आहोत असे मुकुंद किर्दत (प्रवक्ते आम आदमी पार्टी) यांनी म्हटले आहे .
या संदर्भात किर्दत म्हणाले कि,’ महाराष्ट्राचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रसाद लोढा यांनी काल विधवांना प्रतिष्ठा देण्यासाठी गंगा भगीरथी असा उल्लेख करावा अशा पद्धतीचा प्रस्ताव ठेवला आहे.सदरचा प्रस्ताव हा अत्यंत प्रतिगामी व देशाला दोनशे वर्षांनी मागे नेणारा आहे असे सांगत आम आदमी पार्टीने त्याचा निषेध केला आहे
तब्बल दोनशे वर्षांपूर्वी सती प्रथेविरुद्ध राजा राम मोहन राय यांनी लढाई लढली होती. त्याकाळी महिलेला विधवा महिलेला गंगा भगीरथी नावाने अपमानित केले जात असे. प्रत्यक्षात समाजामध्ये अनेक कुप्रथा होत्या. त्यामध्ये सती जाण्यापासून ते केस मुंडन तसेच मंगळसूत्र काढून घेणे, कुंकू पुसणे , पायातले जोडवी उतरवणे अशा अनेक प्रथा समाजामध्ये होत्या तर काही अजूनही आहेत. यासंदर्भात मागच्याच वर्षी अशा कूप्रथा पाळल्या जाऊ नयेत असे ठराव ग्रामपंचायतीने करावेत असा प्रयत्न झाला आणि आता खुद्द मंत्रिमहोदयांनीच हा गंगा भगीरथीचा उलट्या प्रवासाचा प्रस्ताव आणला आहे.
कुठल्याही व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य आपल्या संविधानाने दिलेले आहे आणि त्याप्रमाणे कुठलीही भेदभावाची वागणूक करण्यास संविधान अडकाठी करतेत्यामुळे अशा भेदभाव करणाऱ्या कुठल्याही उपाधींचा आम आदमी पार्टी विरोध करते. महिलांचे स्त्रियांचे जगणे हे एका स्वतंत्र व्यक्तीचे जगणे असून त्याला पुरुषांच्या त्यांच्या आयुष्यातील असण्याचा अनावश्यक संदर्भ जोडला जाणे हे गैर आहे. तिच्या आयुष्यामध्ये पुरुषांच्या असण्यात व नसल्याने फरक पडू नये अशी संधी व सुविधा देण्याची जबाबदारी समाजाची आणि शासनाची सुद्धा आहे. त्यामुळेच नवऱ्याच्या मरण्याच्या संदर्भाने महिलेस विशेषणे लावणे हे अयोग्य आहे. यासंदर्भातील महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची भूमिका सुद्धा आश्चर्यकारक आहे. आम आदमी पार्टी त्याचाही निषेध करते. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना रूपाली चाकणकर यांची भूमिका त्यांना मान्य आहे का याचा खुलासा करावा.

