एकनाथ शिंदेंसारखा प्रयोग राष्ट्रवादीसोबतही सुरू-संजय राऊत म्हणाले त्यावरच झाली शरद पवारांशी चर्चा

Date:

मुंबई-एकनाथ शिंदे व संपूर्ण शिंदे गट ईडीच्याच भीतीने भाजपसोबत गेला, असा दावा करत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतही हाच प्रयोग सुरू आहे, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.तसेच, अजित पवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, असा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. त्यावर आज पत्रकारांनी शरद पवारांना विचारले असता ‘मला त्याबाबत काही माहिती नाही’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.असे तुम्ही कोणाचे नाव घेऊ नका असे ते म्हणाले मात्र त्यांनी यावेळी मुश्रीफ यांचे नाव घेतले त्यांच्यावर दबाव टाकून प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. अमित शाह देखील फोडाफोडी साठीच मुंबईत येत असल्याचे ते म्हणाले.

तुरुंगात जाण्याच्या भीतीने एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केल आहे. तसेच, आपण भाजपमध्ये गेलो नाही तर तुरुंगात जाऊ, अशी भीतीही मातोश्रीवर एकनाथ शिंदेंनी वर्तवली होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे 40 आमदार हे ईडीच्या भीतीनेच भाजपसोबत गेले. ईडीच्या भीतीनेच त्यांनी शिवसेनेत बंड केले आहे. त्यांचा हिंदुत्वाचा दावा धादांत खोटा आहे.

शिंदे गटाला ज्याप्रमाणे ईडीची भीती दाखवून बंड करायला लावले, तसाच प्रयोग सध्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विविध प्रकरणांची भीती दाखवून त्रास दिला जात आहे, असा गौप्यस्फोट पुढे संजय राऊतांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोण फुटणार किंवा कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली बंड होणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते असूनही अजित पवार भाजपबाबत नरमाईची भूमिका घेत आहेत. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये जातील, असा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. त्यावर आज शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांबाबत मला काही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. विशेष म्हणजे शरद पवारांनी अंजली दमानियांचा दावा फेटाळला नाही. त्यामुळे पुन्हा संभ्रम निर्माण झाला असून शरद पवार किंवा अजित पवारांची नेमकी खेळी काय? भूमिका काय?, असेही प्रश्न उपस्थित झाले आहेत.दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यामध्ये विविध मुद्द्यांवरुन खटके उडताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल होताना दिसत आहे. काल राहुल गांधी यांनी दिल्लीत विरोधी पक्षनेत्यांनी बैठक बोलावली होती. त्यात तेजस्वी यादव, नितीशकुमार यादव, आपचे नेते व मल्लिकार्जुन खरगे आदी नेते सहभागी झाले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस या बैठकीत सहभागी झाली नाही. त्यामुळे पुन्हा मविआतील बिघाडीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.दरम्यान, काल राहुल गांधींनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीकडून कोणीच का हजेरी लावली नाही?, यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार म्हणाले, राहुल गांधींनी दिल्लीत बोलावलेल्या बैठकीसाठी मलाही बोलावण्यात आले होते. तेव्हा माझे पुण्यात काही काम होते. त्यामुळे दिल्लीला जाता आले नाही. मात्र, मी उद्या दिल्लीला जात आहे, तेव्हा राहुल गांधी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी

वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी...