भाजपसोबत गेलो नाही तर मला तुरुंगात बसावे लागेल.. एकनाथ शिंदे बंडापूर्वीच मातोश्रीवर येऊन रडलेही होते

Date:

एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केले. तुरुंगाच्या भीतीने ते मातोश्रीवर येऊन रडलेही होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी केलाय. हैद्राबादमधील गितम विद्यापीठाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.महाराष्ट्रातील राजकारण, पर्यावरण, शिवसेना याबाबत या कार्यक्रमात त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी गौप्यस्फोट केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केलंय. भाजपसोबत गेलो नाही तर मी तुरुंगात असेन, असे एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन म्हणाले होते. एकनाथ शिंदे त्यावेळी मातोश्रीवर येऊन रडले होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.शिवसेना सोडून गेलेले 40 आमदार हे स्वत: साठी आणि पैशांसाठी गेले आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून त्यांना अटक होणार होती, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.दरम्यान, जवळपास आठ महिन्यांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केले. या बंडामुळे मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले.आदित्य ठाकरे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अंजली दमानिया यांनी अजित पवार लवकरच भाजपमध्ये जातील असे वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या जवळीकीची चर्चा रंगलेली असतानाच आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे बंडखोरीवर आरोप- प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे.

आमच्यासोबत आला नाहीत तर जेलमध्ये .

आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्यावेळी त्या म्हणाल्या, बंडात हिंदुत्वाचा मुद्दा कधीच नव्हता. हे उघड झालेय. असे त्या म्हणाल्या.ज्या ज्या लोकांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल होत्या. त्या फाईल्स उघडल्या जाण्याची भीती होती. त्यामुळे त्यांना भीती वाटत होती. भाजपची ही मोडस ऑपरंडसी आहे. आमच्यासोबत आलात तर आम्ही तुम्हाला वॉशिंग मशिनमध्ये धुऊन काढू आणि दोषमुक्त करू. पण, जर आमच्यासोबत आला नाहीत तर जेलमध्ये . एकतर भाजपात या नाहीतर जेलमध्ये जा. ही भूमिका कित्येक उदाहरणे देऊन स्पष्ट करता येतील. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेत काही वावगे नाही, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...