महापालिकेच्या ट्रक टर्मिनस च्या जागेतच जुगार अड्डा आणि बेकायदा हॉटेल्सची जंत्री …
महापालिका आयुक्त येथे कारवाईला का घाबरतात ?
पुणे- पत्र्याच्या शेडवरच एका राजकीय माजी लोकप्रतिनिधीचे नाव टाकून ,आणि गैरधंद्यांना विरोध करणाऱ्यांना धमक्या देऊन कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या स्वारगेट -कात्रज रस्त्यावरील शंकर महाराज मठ आणि केके मार्केट नजीक असलेल्या ‘त्या’ कथित जुगार अड्ड्यावर अखेरीस पोलिसांनी धाड टाकली .यापूर्वीच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही हा अड्डा बिनदिक्कत पणे चालविण्यात येत होता. आता अर्थात हि धाड तात्पुरती दिखाऊ ठरेल कि हा अड्डा कायमचाच बंद केला जाईल हे मात्र पोलिसांच्या पुढील हालचालींवरच दिसून येणार आहे.
या जुगार अड्डयावर छापा टाकुन १४ इसमावर कारवाई करून त्यांचेकडुन रोख २२,८४०/- रू. किचा मुद्देमाल जप्त केला
के के मार्केट गॅरेज सहकारनगर पुणे येथे पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशीरपणे जुगार खेळत व खेळवत असलेबाबत बातमीदार मार्फत पोलिसांना सांगण्यात आली.या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी पाळत ठेवुन छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने १३ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन जुगारातील २२,८४०/- रूपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले १३ इसम व वाँटेड असलेला एक गुन्हेगार सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुरनं.९४/२०२३, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमकलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता सहकारनगरपोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे,शहर, रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त,पुणे शहर, श्री. देप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि. अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, अजय राणे,तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, किशोर भुजबळ या पथकाने केली आहे.


