रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई, 2700 किलो तांदूळ जप्त

Date:

पुणे-रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या टेम्पोवर खडकमाळ पोलिसांनी कारवाई करत 2700 किलो तांदूळ जप्त केला आहे. याप्रकरणी जावेद लालू शेख (वय 35), अब्बास अब्दुल सरकावस (34)आणि इम्रान अब्दुल शेख (30, सर्व रा. काशेवाडी,भवानी पेठ, पुणे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी या आरोपींवर पोलिस शिपाई महेश प्रकाश जाधव यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन आणि सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी सोसायटी समोर कासेवाडी, भवानी पेठ, पुणे येथे सार्वजनिक रस्त्यावर आरोपी जावेद शेख, इमरान शेख आणि अब्बास सरकावस हे वेगवेगळ्या रेशनिंग दुकानदारांकडून माल काळ्या बाजारात विकत घेत. ते धान्य एकत्र करून तो मालवाहतूक टेम्पो यामध्ये भरून केडगाव, ता. दौंड, पुणे येथे बाजारात बेकायदेशीर रित्याविक्री करीता घेऊन जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले.पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून तीन लाख रुपये किमतीचा मालवाहतूक एक टेम्पो ( एमएच 12- पीक्यू 0582) आणि 40 हजार 500 रुपये किमतीचा तांदळाने भरलेल्या 54 पांढरे रंगाच्या नायलॉनच्या पिशव्या प्रत्येकी 50 किलो वजन असलेला 2700 किलो तांदूळ ( प्रतिकीलो 15 रुपये प्रमाणे ) जप्त करण्यात आला आहे अशी माहिती खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता यादव यांनी दिली आहे. याबाबत पुढील तपास सहा्यक पोलिस निरीक्षक एच. एम. काळे करत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वगनाट्याची ‘परंपरा आणि योगदान’ सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे लोककला अभ्यासकांचे चर्चासत्रात प्रखर मत..

मुंबई – लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा कलेने समाजमनावर कोरलेली...

उद्या 12 झेडपी, 125 पंचायत समित्यांसाठी मतदान:2193 जागा, 7438 उमेदवार; 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदार करणार फैसला

मुंबई-राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या...

‘शून्य कचरा प्रकल्पा’त दररोज कचरा संकलन-आमदार हेमंत रासने यांची माहिती

पुणे, ता. ६ : कसबा-भवानी विधानसभा मतदारसंघात महानगरपालिकेच्या वतीने...

मोदी मजा करत आहेत, परदेशात जात आहेत..त्यांनी अशी कोणती क्रांती केली की, लोक त्यांच्यावर हल्ला करतील

नवी दिल्ली- लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोदींसोबत संसदेत...