विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्यकारी विश्वस्त पदी तुषार रंजनकर

Date:

पुणे : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्यकारी विश्वस्त पदी माजी विद्यार्थी तुषार रंजनकर यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांची फेरनिवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत २०२३ ते २०२६ या तीन वर्षांकरिता नवे विश्वस्त मंडळ निवडण्यात आले.

सभासद, सल्लागार, कार्यकर्ता या गटातून निवडणूक बिनविरोध झाली. विश्वस्त मंडळाच्या खजिनदारपदी संजय अमृते, सल्लागार मंडळ कार्यवाह पदी ज्योती गोगटे यांची तर स्वीकृत सदस्य म्हणून तुकाराम गायकवाड, मकरंद फडके, प्रीती राव यांची निवड करण्यात आली.

नव्या विश्वस्त मंडळात प्रतापराव पवार, भाऊसाहेब जाधव, विजय पुसाळकर, तुषार रंजनकर, संजय अमृते, रत्नाकर मते, तुकाराम गायकवाड, मकरंद फडके, प्रीती राव, ज्योती गोगटे, सुनंदा माने, विनया ठोंबरे, मनोज गायकवाड यांचा समावेश आहे.

विश्वस्त मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. एक विचार घेऊन आपण सर्वजण काम करत असून, पुढेही एकविचाराने काम करून संस्थेच्या भरभराटीसाठी प्रयत्न करू, असे अध्यक्ष प्रतापराव पवार व नवनिर्वाचित कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांनी नमूद केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...