Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सचिन, स्पिनी आणि अनिल कुंबळे व युवराज सिंग अशा क्रिकेट क्षेत्रातल्या दिग्गजांची अविस्मरणीय सहल

Date:

पुणे –

Go Far या ब्रँड तत्वाचा एक भाग म्हणून स्पिनी या भारतातील फुल- स्टॅक युज्ड कार खरेदी- विक्री प्लॅटफॉर्मने आपले धोरणात्मक गुंतवणूकदार आणि स्क्वॅड कॅप्टन सचिन तेंडुलकर तसेच अनिल कुंबळे व युवराज सिंग यांसारख्या क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांबरोबर आयपीएल कॅम्पेन लाँच केले आहे. ही फिल्म ३१ मार्च ते २८ मे २०२३ दरम्यान चालणार असलेल्या आयपीएल २०२३ दरम्यान लाँच केली जाणार आहे. या कॅम्पेनमध्ये कशाप्रकारे लोक आपलं प्रेम, स्वप्नं किंवा स्वतःसाठी झटतात आणि आयपीएलच्या बाबतीत सांगायचं झालं, तर त्यांच्या स्क्वॅडसाठी कसे लढतात हे दाखवलं जाणार आहे.

गो फार फॉर युवर स्क्वॅडमध्ये हे लीजंड्स स्पिनी एसयूव्हीमधून रोड ट्रिप काढणार आहेत. ही अर्थातच अशी सहल असेल, ज्यामध्ये सहभागी होण्यासाठी क्रिकेटचे चाहते काहीही करायला तयार होतील.

फिल्म आणि स्पिनीविषयी सचिन तेंडुलकर म्हणाले, ‘स्पिनीला आपल्या ग्राहकांना विश्वास, पारदर्शकता आणि सचोटी या मूल्यांच्या आधारे कार खरेदी आणि विक्रीचा आनंददायी अनुभव द्यायचा आहे. पॅशनेट कारप्रेमी या नात्याने कॅम्पेनसाठी टीमबरोबर काम करणं आणि कार खरेदी व ड्रायव्हिंगबद्दलच्या भावना व्यक्त करणं अविस्मरणीय होतं. यावेळेस आम्ही युवराज आणि अनिल यांना सहलीला घेऊन जायचं ठरवलं. फिल्मच्या शूटिंगमध्ये खूप मजा आली आणि मला आशा आहे, की ही फिल्म प्रेक्षकांमध्ये मैत्रीच्या जुन्या आठवणी जागवेल.’

या कॅम्पेनविषयी स्पिनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निरज सिंग म्हणाले, ‘आमचा जीवनावर आणि निवडीवर ठाम विश्वास आहे. सर्व ग्राहकांना त्यांना खरंच, मनापासून हवी असलेली, त्यांना आनंद देईल अशी कार खरेदी करता यायला हवी. आम्ही गो फार ची ब्रँड स्टोरी आयपीएल कॅम्पेनसह विविध अंतर्गत आणि बाह्य टच पॉइंट्सवर नेणार आहोत. आयपीएल म्हणजे संघभावना, मनोरंजन, खेळाडू आणि टीमला पाठिंबा देणं. ही भावना मजेदार, हलक्याफुलक्या, ग्राहकांना आवडेल अशा पद्धतीनं आणि मुख्य म्हणजे त्यांचा आवडता खेळ पाहाताना आनंद घेता येईल अशा तऱ्हेनं मांडायची होती. गो फार फॉर युवर स्क्वॅड तुम्हाला आवडत्या टीमला पाठिंबा देण्याचं आवाहन करणार आहे. संघातील एक खेळाडू म्हणून इतरांसाठी आणि आपल्या स्क्वॅडसाठी हवं ते करणं, अगदी सचिन तेंडुलकरनं आपल्या मित्रांना सहलीला नेलं तसं. स्पिनीमध्ये आम्ही सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या स्क्वॅडसह प्रत्येक ग्राहकाला आनंद देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यावर भर देतो. कोणत्याही कुटुंबासाठी कार खरेदी खास असते आणि प्रत्येक ग्राहकासाठी ती आणखी खास बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे.’

या फिल्मची संकल्पना स्पिनीच्या क्रिएटिव्ह पार्टनर तान्या महेंद्रु यांची आहे. ‘आयपीएलमध्ये आम्हाला आमच्या लेजंड्सना शोभेल अशी संकल्पना मांडायची होती. या सीझनमधली तरुणाई काहीतरी मोठं करून दाखवण्याच्या प्रयत्नांत असताना हे लेजंड्स मात्र अगदी त्याविरूद्ध करत आहेत, चक्क सहलीला जात आहेत, क्रिकेटच्या विश्वाबाहेर जात नव्या आठवणी तयार करत आहेत. आणि त्यांच्या या प्रवासाची साक्षीदार, त्यांच्या सहलीची योजक आहे, ती एक कार! आम्हाला त्यांना आतापर्यंत कधी न पाहिलेल्या रूपात- जास्त वास्तववादी, गप्पा मारताना, कोणत्याही बंधनांशिवाय आणि आपल्या स्क्वॅडबरोबर मजा करताना दाखवायचं होतं.’

गो फार फॉर युवर स्क्वॅडचा सारांश सांगायचा, तर तुम्ही टीमचा भाग असणं महत्त्वाचं आहे, मग ती टीम खेळातली असो किंवा मित्रांची.’

या फिल्मची निर्मिती टायगर बेबी यांची असून कॅम्पेनविषयी टायगर बेबीच्या संस्थापक झोया अख्तर म्हणाल्या, ‘ही टायगर बेबीची पहिली व्यावसायिक जाहिरात आहे आणि त्यासाठी स्पिनीबरोबर काम करणं आनंददायी होतं. स्टुडिओ या नात्याने आम्ही सर्व फॉरमॅट्समधून गोष्टी सांगतो आणि मनोरंजन करतो व हे कॅम्पेन खरंच सुंदररीत्या तयार केलं गेलं आहे. अशाप्रकारच्या आणखी भागिदारी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

‘मजेदार आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकणारी संकल्पना शोधणं ताजंतवानं करणारं होतं. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आमच्यापुढे एकच मार्ग होता आणि तो म्हणजे शूटिंग करताना मजा करणं, शिवाय क्रिकेटमधल्या या लेजंड्सनाही तसंच वाटायला लावणं. मला आशा आहे, की प्रेक्षकांनाही ही फिल्म पाहाताना छान वाटेल,’ असे या फिल्मचे दिग्दर्शक अर्जुन वारेन सिंग म्हणाले.

गो फार सीरीज ही अशाप्रकारची पहिलीच जाहिरात आहे, ज्यात स्पिनीचे धोरणात्मक गुंतवणूकदार व ब्रँड अम्बेसिडर सचिन तेंडुलकर यांनी काम केलं आहे व ब्रँडने त्यांच्यासाठी त्यांची पहिली कार बेयर्स ब्लू मारूती ८०० परत तयार केली. फिल्ममध्ये सचिन या कारमध्ये आपल्या आणखी एका आवडीच्या गोष्टीविषयी म्हणजेच सिनेमे आणि त्यात कशाप्रकारे सामान्य लोक आपलं प्रेम किंवा स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी झटतात, एकत्र येऊन अविस्मरणीय क्षण तयार करतात याविषयी भरभरून बोलताना दिसतील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...