भाजपा आणि राष्ट्रवादी एक झाली तर शिंदे गट बाहेर पडेल – शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळांचे स्पष्ट संकेत

Date:

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर भाजपसोबत गेला तर आम्ही स्वत:च्या बळावर निवडणुका लढवू शकतो असे विधान शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी केले आहे. गोव्यामध्ये माध्यमांशी बोलत असताना हे मोठे विधान केले आहे.शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ म्हणाले की, भाजपा आम्हाला तुम्ही सोबत येऊ नका असे म्हणेल असे वाटत नाही आणि म्हणाले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आमचा मुख्यमंत्री इतका सक्षम आहे, की आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू शकतो. आनंदराव अडसूळ यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मतभेद आहेत की काय असा सवाल उपस्थित होताना दिसून येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंनी राजीनामा देताना मविआतील मित्रपक्षांना विचारात घेतले नाही. त्यांनी स्वत: निर्णय घेतला. तर शरद पवारांनी अदानीवरुन घेतलेल्या भूमिकेवर मविआमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यात शरद पवारांनी नागालॅंडमध्ये भाजप सरकारला दिलेला पाठिंबा, यावरुण राज्यात भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना उधान आले आहे. यावर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी हे वक्तव्य केले आहे.

शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी 2009 ते 2019 अशी 10 वर्षे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. शिवसेनेच्या नेतेपदाची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, 2019 ला नवनीत राणा यांनी त्यांचा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने पराभव केला. यानंतर त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. ते ईडीच्या चौकशीच्याही फेऱ्यात अडकल्यानंतर त्यांनी शिवसेनेतील नेते पदाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...