पुणे-कुठल्याही नगरनियोजनाचा विचार न करता, तपशील न देता केवळ एका माजी मंत्र्याच्या राजकीय कारकिर्दीसाठी किंवा अस्तित्वासाठी पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेली उरळी देवाची आणि फुरसुंगी हि २ गावे वगळल्याचा आरोप करण्यात येतो आहे . ज्यामुळे या दोन्ही गावांमधील नागरिकांची हेळसांड निर्माण होणार आहे. ना महापालिकेत ना नगरपालिकेत आणि ना ग्रामपंचायतींचे व्यवस्थित कारभार अशा अवस्थेत हि गावे लटकणार आहेत असे सांगितले जाते याच पार्श्वभूमीवर आज भाजपचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी देखील हा निर्णय राजकीय असल्याचा आरोप करत नगर नियोजनाचा विचार न करता एका राजकीय नेत्याच्या हट्ट पुरवायला पाहिजे म्हणून हा निर्णय घेतला आहे.अशी टीका केली आहे. या निर्णया संदर्भात आपण विहित मुदतीत हरकत नोंदवणार आहोत गरज भासल्यास हायकोर्टामध्ये जाणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.या गावांसाठी नवी नगरपालिका करणार असल्याचे सांगण्यात येते पण या नगर परिषदेचे आर्थिक स्त्रोत काय राहील याचा विचार आणि उल्लेख राजपत्रांमध्ये नाही.याकडे केसकर यांनी लक्ष वेधले आहे.
उरळी देवाची आणि फुरसुंगी गावे वगळली ती एका माजी मंत्र्याच्या राजकीय अस्तित्वासाठी
Date:

