डॅा.बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण देण्याची  शिवसेनेची मागणी

Date:

महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन 

पुणे :“ महात्मा फुलेंच्या विचारांचे कृतीशील वारस,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा.बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा ‘, अशी मागणी पुणे शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  यांनी केली आहे. आज पुणे शहर शिवसेनेचे प्रमुख संजय मोरे,उपप्रमुख डॉ.अमोल देवळेकर यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी समता भूमी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन केले,त्यानंतर ही मागणी केली.यासंदर्भात त्यांनी एक पत्रकही प्रसिद्धीस दिले आहे.गजानन थरकुडे,उत्तम भुजबळ,विशाल धनावडे,पल्लवी जावळे,पृथ्वीराज सुतार,बाळा ओसवाल,अशोक हरणावळ,संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे तसेच राष्ट्रवादी च्या एड. रुपाली पाटील-ठोंबरे उपस्थित होत्या . 

‘गेली नऊ दशके अव्याहतपणे फुले विचारांची कास धरून सामाजिक  क्षेत्रात सतत कार्यरत असणारे डॅा. बाबा आढाव हे खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंच्या विचारांचे कृतीशील वारस आहेत. फुले जयंती प्रसंगी बाबा आढाव यांच्यासारख्या ऋषितुल्य वक्तित्वाचा सन्मान करणे म्हणजे आपला प्रबोधनकारी वारसा जपणे होय.येणाऱ्या महाराष्ट्र दिनी बाबा आढावांचा ‘महाराष्ट्र भुषण’ पुरस्कार देऊन सन्मान व्हावा ही सर्वांचीच इच्छा आहे.या मागणीचा आदर करत सरकारने त्वरित तशी घोषणा करावी आणि समविचारी सर्व लोकांनी या संदर्भात तशी निवेदने  माध्यमातून मुख्यमंत्री व सरकारकडे करावी’, असे या पत्रकात म्हटले आहे.
‘सत्यशोधक’ विचारांचा हा वारसा फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अमुल्य असा ठेवा आहे.महापुरूषांच्या प्रतिमेचा-कार्याचा गुणगौरव तर आपण त्यांच्या जन्मदिनी करतोच परंतू त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणे हिच त्यांच्याप्रति खरी कृतज्ञता ठरेल’, असे या पत्रकात म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी

वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी...

अजितदादा यांच्या निधनामुळे महापौर निवडीनंतर भाजपकडून कोणताही जल्लोष होणार नाही – गणेश बिडकर

महापौर निवडीनंतर केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव! पुणे: पुणे महानगरपालिकेतील...