पुणे- शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महापालिकेत बदली साठी १० ते ३० लाखाचा भाव फुटल्याची तक्रार नगरविकास मंत्रालयाकडे केल्यावर आणि आंदोलनाचा इशारा दिल्यावर शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनीही ३ वर्षाहून अधिक काळ अनेक अधिकारी बदली न होता आपापल्या मलईदार जागेवर चिकटून असल्याचे म्हटले आहे.मिळकत कर विभागात तर २०१० पासून बदल्याच झालेल्या नाहीत असेही त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.आणि आता या प्रकरणी आंदोलनाचा इशारा ही दिला आहे.
नाना भानगिरे यांनी आज महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे कि, दर ३ वर्षांनी बदली करण्याच्या धोरणास हरताळ फसला जातो आहे,अभियंत्यांच्या बदल्यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा असली तरी लिपिक ,टंकलेखक,वरिष्ठ लिपिक ,उपाधीक्षक ,अधीक्षक, प्रशासन अधिकारी यांच्या २०१२ पासून बदल्याच झालेल्या नाहीत .२०१२ नंतर ज्यांचा वशिला नाहीच अशांच्या बदल्या झाल्यात .कर आकारणी आणि कर संकलन विभागात तर २०१० पासून कर्मचारी आणि अधिकारी तहान मांडून आहेत त्यांच्या बदल्याच होत नाहीत यामुळे त्यांची मक्तेदारी झालेली आहे.हाच प्रकार सामान्य प्रशासन विभाग , मालमत्ता व्यवस्थापन ,मुख्य लेखापाल ,दक्षता विभाग या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या १० वर्षाहून अधिक काल झाल्या तरी झालेल्या नाहीत हि वस्तुस्थिती आहे.यामुळे येथे काम करणारे आमच्या शिवाय महापालिकेला पर्याय नाही अशा वल्गना करून मनमौजी पण करत आहेत.आणि प्रतिनियुक्तीवर आलेले शासकीय अधिकारी विनाकारण फाईली अडवून स्वतःबाबत गूढ वाढवून घेण्यात धन्यता मानत आहेत .त्यामुळे सेवक वर्ग विभाग आयुक्तांनी स्वतःच्या अधिपत्याखाली घ्यावा ,इंजिनिअर ,कर विभाग क्लार्क यांच्या नियमानुसार बदल्या तातडीने कराव्यात अन्यथा आम्ही शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करू असा इशारा भानगिरे यांनी दिला आहे.

