पुणे- राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असताना आणि त्यांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही सरकारने जनतेचे भले करणारे काम वेगाने केलेले असताना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का रखडवल्या आहेत ? हीमत असेल तर या निवडणुका घ्या असे जाहीर आव्हान देत रस्त्रावडीचे माजी महापौर आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दंड थोपटले आहेत.
काकडे यांनी असे म्हटले आहेकी,’ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारने तारीख मागून घेतल्यामुळे पुन्हा पुढे गेल्या आहेत. गेल्या तारखेच्या वेळी राज्य सरकारचे वकील आजारी असल्यामुळे तारीख मागून घेतली आजच्या तारखेला काहीही कारण नव्हतं, पण राज्य सरकारला या निवडणुका घ्यायच्या नाहीत हे निश्चित झाले आहे. खरं म्हटलं तर आज सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय अपेक्षित होता, परंतु राज्य सरकारने पुन्हा तारीख मागून घेऊन या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. राज्य सरकारमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी या निवडणुका त्वरित घ्याव्यात. शिंदे, फडणवीस सरकार अतिशय चांगलं काम करीत आहे, असं त्यांचा दावा आहे. त्यामुळे त्यांनी घाबरण्याचे काही कारण नाही, पण निवडणुका घेण्याची हिंमत मात्र त्यांच्यात नाही हे महाराष्ट्रातील जनतेला समजून आले आहे.
अरे हिम्मत असेल तर घ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका: अंकुश काकडेंनी थोपटले दंड
Date:

