राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे सोमवारी  वितरण

Date:

मुंबई: नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन आणि कलादान या कलेच्या विविध क्षेत्रांत प्रदीर्घ काळ सेवा केलेल्या कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने  दि.१० एप्रिल २०२३ रोजी कलांगण, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे सन्मानित करण्यात येणार आहे. रुपये एक लक्ष, मानचिन्ह, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

सन्मानित केले जाणारे मान्यवर:

नाटक : कुमार सोहोनी(2020) गंगाराम गवाणकर (2021), कंठसंगीत :  पंडितकुमार सुरशे (2020)  कल्याणजी गायकवाड (2021),उपशास्त्रीय संगीत :  शौनक अभिषेकी (2020)  देवकी पंडीत (2021),चित्रपट ( मराठी) :  मधु कांबीकर (2020)   वसंत इंगळे (2021), किर्तन :  ज्ञानेश्वर वाबळे  (2020)   गुरुबाबा औसेकर (2021),शाहिरी :  अवधूत विभूते (2020)  कै. कृष्णकांत जाधव(मरणोत्तर) (2021),नृत्य :  शुभदा वराडकर (2020)   जयश्री राजगोपालन (2021),कलादान :  अन्वर कुरेशी  (2020)   देवेंद्र दोडके (2021),वाद्यसंगीत : सुभाष खरोटे  (2020)   ओंकार गुलवडी  (2021), तमाशा :  शिवाजी थोरात (2020)   सुरेश काळे (2021),लोककला :  सरला नांदुरेकर (2020)    कमलबाई शिंदे (2021),आदिवासी गिरीजन :  मोहन मेश्राम (2020)   गणपत मसगे (2021) या मान्यवरांना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहूल शेवाळे, आमदार सदा सरवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
या पुरस्कार प्रसंगी उत्सव महासंस्कृतीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून श्रीधर फडके, सावनी रवींद्र, भजनसम्राट ओमप्रकाश, कार्तिकी गायकवाड, संदेश उमप, संपदा माने, संपदा दाते, शाहीर संतोष साळूंखे, संघपाल तायडे तसेच शिल्पी सैनी आदी कलाकारांचे नृत्य, नाटय, भक्ती, संगीत, रंजन करणाऱ्या कलांचे सादरीकरण होणार आहे. या कायक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर करणार आहेत. महाराष्ट्राच्या कलारत्नांचा सन्मान करण्यासाठी तसेच यासोबत सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...

चीन प्रश्नी भूमिका स्पष्ट करा, माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे पुस्तक तात्काळ प्रसिद्ध करा

केंद्रातील मोदी सरकारविरोधात मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन. मुंबई, दि. ४...