कॉंग्रेसच्या शहर अध्यक्षांनी म्हटले आता रोखा हा कारभार अन्यथा उग्र आंदोलन
पुणे-महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असून कधी निवडणुका होतील आणि लोकप्रतिनिधींच्या अंकुशाखालील कारभार सुरु होईल हे कोणाशी सांगणे कठीण झालेले आहे या काळात आता महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार वाढल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.महापालिकेतील वर्ग १ वर्ग २ आणि वर्ग ३ अशा तिन्ही स्तरावर बदल्यांसाठी लाखो रुपयांचा मलिदा चारला जातो आहे. मलईदार जागेवर बसण्यासाठी ३० लाखाचा भाव फुटला असून वर्ग १ साठी बदलीत २० लाख तर वर्ग २ आणि ३ साठी प्रत्येकी १०/ १० लाख मोजावे लागत असल्याची ओरड सुरु झाली आहे. यात प्रामाणिक अधिकारी कर्मचारी यांची मुस्कटदाबी होत असून पात्र अधिकारी सडत आहेत आणि अपात्र अधिकारी चंगळ करू लागले आहेत, यामुळे महापालिकेचा दर्जा प्रचंड घसरला आहे,हा भ्रष्ट कारभार त्वरित रोखा अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन हाथी घ्यावे लागेल असा इशारा शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिला आहे. त्यांनी याबाबत नगरविकास मंत्री यांना पत्र दिले आहे तसेच महापालिका आयुक्तांना देखील पत्र दिले आहे.



