भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा ३ हजार २७७ लाभार्थ्यांना लाभ

Date:

गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक विद्यार्थ्यांना लाभ

पुणे: राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विशेष विभाग विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा २०२२-२३ या वर्षात ३ हजार २७७ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून एकूण अर्ज ३ हजार ६०० इतके प्राप्त झाले असल्याने उर्वरित लाभार्थ्यांना निधी प्राप्त होताच तात्काळ लाभ देण्यात येईल, असे समाज कल्याण पुणेच्या सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी कळविले आहे.

सामाजिक न्याय विशेष विभागाच्या १३ जून २०१८ च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. शासनाने इयत्ता १० वी नंतरच्या इयत्ता ११ वी १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या मात्र शासकीय वसतिगृहात राहत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना राबविण्यात येते.

या योजनेंतर्गत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत २०१७-१८ मध्ये ६५६ विद्यार्थ्यांना १६ लाख ३९ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. २०१८-१९ मध्ये १ हजार ४५७ विद्यार्थ्यांना ७ कोटी ३० लाख ८२ हजार रुपये, २०१९-२० मध्ये १ हजार ५९७ विद्यार्थ्यांना ७ कोटी ३७ लाख १६ हजार रुपये, २०२०-२१ मध्ये ९३६ विद्यार्थ्यांना ८९ लाख १७ हजार रुपये, २०२१-२२ मध्ये १ हजार १६३ विद्यार्थ्यांना ३ कोटी ४ लाख ५९ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात अधिक प्रमाणात अर्ज प्राप्त होतात. या योजनेत २०२२-२३ मध्ये ३ हजार ६०० हर्ज प्राप्त झालेले असून प्राप्त १० कोटी ९ लाख ३८ हजार रुपये तरतूदीतून ३ हजार २७७ विद्यार्थ्यांना लाभ दिला आहे. पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी १० कोटी रुपयांची मागणी विभागाकडे करण्यात आली आहे. तरतूद प्राप्त होताच सर्व अर्ज निकाली काढण्यात येतील. स्वाधार योजनेबाबत विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास त्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही श्रीमती डावखर यांनी केले आहे.
000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढला …

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ...

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक

पुणे-पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या...

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस...