हडपसर मधील भाजीमंडई साठी 84 लाख खर्च करणार

Date:

माजी नगरसेवक नाना भानगिरे यांचा पुढाकार

पुणे-हडपसर येथील चिंतामणी नगरची आगीत दुरवस्था झालेल्या भाजी मंडईच्या सुधारणेसाठी महापालिका सुमारे ८४ लाख रुपये खर्च करणार आहे . आगीत इथल्या  गाळेधारकांचे खूप नुकसान झाले होते. तेव्हापासून भाजी मंडई बंद आहे. मात्र आता लवकरच मंडई पूर्ववत होणार आहे. त्यासाठीची टेंडर प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.

दि.२१/२/२०२३ रोजी हडपसर येथील ओटा मार्केटला शॉर्टसर्किटमुळे आग लागून मार्केटचे व व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . 90 दुकाने यामध्ये जळाली होती. अजूनही हे मार्कट बंद आहे. त्याभागातील नागरिकांचे गैरसोय होत असल्याने तेथीलमाजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी उपरोक्त ठिकाणी भेट देऊन ओटा मार्केटचे कामकाज प्रशासनामार्फत त्वरित करणेबाबत सुचविले होते. त्यानुसार अतिक्रमण विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.या कामासाठी 84 लाख 30 हजाराचा खर्च अपेक्षित आहे. सुरुवातीला हे काम महानगरपालिका अधिनियमातील कलम ६७ (३)(क)नुसार करून घेण्याबाबत वित्तीय समिती समोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी हे काम शॉर्ट टेंडर प्रक्रिया करून घेण्याचे आदेश खात्याला दिले. दरम्यान मार्च एन्ड ला हे काम खात्याकडून होऊ शकले नाही. तसेच नवीन बजेट मध्ये यासाठी खात्याला निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे भवन रचना विभागाकडील निधीचे लॉकिंग करून लवकरच टेंडर प्रक्रिया सुरु करणार असल्याचे माधव जगताप यांनी सांगितले. यामुळे येथील गाळेधारक आणि नागरिकाना दिलासा मिळणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढला …

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ...

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक

पुणे-पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या...

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस...