फडणवीस लाचार, लाळघोटे;एकनाथ शिंदे गुंडांचे मंत्री,ठाण्याचे पोलिस आयुक्त बिनकामाचे-उद्धव ठाकरे संतापले ..

Date:

गुंडांनी रोशनी शिंदेंच्या पोटात लाथा मारल्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होम टाऊन असलेल्या ठाणे शहरात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला अमानुष मारहाण झाल्याची घटना घडली आहे. महिलेवर सध्या ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची गांभीर्याने दखल घेत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी आज संपदा रुग्णालयात जात जखमी महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांची भेट घेतली.भेटीत उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी रोशनी शिंदे यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी रुग्णालयाबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. त्यांनी शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे हे ठाणे पोलिस आयुक्तांशीही याप्रकरणी चर्चा करणार आहेत व नंतर पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

मुंबई- गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नपुंसक म्हटले होते. त्याची प्रचिती काल ठाण्यात आली, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना काल ठाणे शहरात अमानुष मारहाण करण्यात आली. त्यावरुन आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राला अतिशय फडतूस गृहमंत्री लाभले आहेत. लाचार, लाळघोटे करणारे, नुसते फडणवीसी करणारा माणुस गृहमंत्रीपद मिरवतोय. त्यांना गृहमंत्रीपद झेपत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. सरकारच नपुंसक म्हटल्यावर कोणाकडून अपेक्षा ठेवायचे. जिवाला जीव लावणारे, महिलांचे संरक्षण करणारे, आनंद दिघेंचे ठाणे, अशी ठाण्याची सुसंस्कृत ओळख होती. मात्र, आता गुंडांचे ठाणे, अशी ठाण्याची ओळख होत आहे. ठाण्यात महिलांचीही गँग तयार केली जातेय का? महिला कार्यकर्त्यांवर महिलांकडूनच अशी अमानुष मारहाण यापूर्वी महाराष्ट्रात कधीही झाली नव्हती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणायचे की गुंडमंत्री? असा प्रश्न आता पडला आहे. एकनाथ शिंदे आता गुंडांचे मंत्री झाले आहेत. मनात आणल तर आता या क्षणाला ठाणेच काय अवघ्या महाराष्ट्रातून या गुंडांची गुंडगिरी आम्ही उखडून फेकून देऊ शकतो. राज्य सरकार नपुंसक असेल. मात्र, शिवसैनिक हा नपुंसक नाही. बाळासाहेबांच्या नावाने या गुंडांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतला आहे. मात्र, महिलांवर हल्ला करणारे हे नपुंसक आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले, रोशनी शिंदे यांनी एकनाथ शिंदेंबद्दल काही पोस्ट टाकली म्हणून त्यांना निर्घृण मारहाण करण्यात आली. गुंडांनी आधी त्यांना व्हिडिओद्वारे माफी मागायला लावली. रोशनी शिंदे यांनी माफी मागितल्यानंतरही त्यांच्या पोटात निर्घृणपणे लाथा मारण्यात आल्या. रोशनी शिंदे या गर्भधारणेसाठी उपचार करत आहेत. त्यामुळे पोटात मारू नका, अशी विनवणी त्यांनी केली. त्यानंतरही गुंडांनी दयामाया न दाखवता मारहाण केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, याप्रकरणाबाबत माहिती देण्यासाठी आयुक्तालयात गेलो तर तेथे आयुक्तच उपस्थित नाहीत. असे बिनकामाचे आयुक्त काय कामाचे? यापूर्वी ठाण्यातच एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यात हे असे शोभते का? पोलिस दबावाखाली आहेत का? गृहमंत्र्यांना थोडी जरी लाज, लज्जा, शरम असेल तर त्यांनी ताबडतोब अशा बिनकामाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे.

उद्धव ठाकरे म्हणाले, हे गुंड लोक सावरकरांच्या नावाने गौरव यात्रा करत आहेत. मात्र, त्यांना आता जेलयात्रा करावीच लागणार आहे. रोशनी शिंदे यांना मारहाण करणाऱ्यांना सरकारने तातडीने अटक करावी किंवा सत्तेतून बाहेर पडावे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...