सिक्कीममध्ये हिमस्खलन, 7 पर्यटकांचा मृत्यू:11 गंभीर

Date:

सिक्कीमची राजधानी गंगटोकमध्ये मंगळवारी हिमस्खलन झाले. त्यात 6 पर्यटकांचा बळी गेला. मृतांत 4 पुरुष, 2 महिला व एका मुलाचा समावेश आहे. ही घटना दुपारी 12.20 च्या सुमारास गंगटोकला नाथु ला पासशी जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू मार्गावर घडली.आतापर्यंत 22 पर्यटकांना बर्फाबाहेर काढण्यात आले आहे. त्यातील 11 जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना गंगगोट स्थित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(Video: Indian Army)

दुर्घटना घडलेल्या भागात 13 व्या मैलाच्या माइलस्टोनपर्यंत जाण्याचा पास जारी केला जातो. त्यापुढे जाण्याची परवानगी नाही. पण हे पर्यटक जवाहरलाल नेहरू मार्गावरील 14व्या माईलस्टोनपर्यंत गेले. नेमका तिथेच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने या ठिकाणी तातडीने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 22 जणांची सुटका करण्यात आली. यातील 6 जणांना खोल दरीतून बाहेर काढण्यात आले.

नाथुला पास चीनच्या सीमेवर स्थित आहे. नैसर्गिक सुंदरतेमुळे येथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, जवाहरलाल नेहरू मार्गावरील 14 व्या मैलाच्या दगडाजवळ झालेल्या हिमस्खलनात 25-30 पर्यटक अडकले होते. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (BRO) युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करून 22 जणांना वाचवले. यापैकी 6 जणांना खोल दरीतून बाहेर काढण्यात आले. जवळपास 350 जण व 80 वाहने रस्त्यातील अडचणींमुळे नाथु ला पासलगत अडकले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...