पं. रघुनंदन पणशीकर यांचे बहारदार गायन ; श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्री रामनवनी उत्सवात गायनसेवा ; उत्सवाचे २६२ वे वर्ष
पुणे :सुमिरन कर भज राम नाम…कैवारी हनुमान अमुचा…राम रंगी रंगले मन…अशा रामस्तुती करणा-या रचना आणि विविध भक्तीगीताच्या सादरीकरणाने पेशवेकालीन तुळशीबाग राम मंदिरात रामनामाच्या गजरात भाविक तल्लीन झाले. पं. रघुनंदन पणशीकर यांच्या सुरेल वाणीतून बहारदार भक्तीगीते व शास्त्रीय गायनाची अनुभूती पुणेकरांनी घेतली.
निमित्त होते, श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पं.रघुनंदन पणशीकर यांनी गायनसेवा अर्पण केली. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद चंद्रकांत तुळशीबागवाले, विश्वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.
पं.रघुनंदन पणशीकर यांनी रागेश्री रागामध्ये गायनसेवेला प्रारंभ केला. बाजे रे मुरलीया बाजे… या गीताला रसिकांनी विशेष दाद दिली. अवघा रंग एकची झाला या नाटकातील येरे येरे रामा… या रचनेच्या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात साथ दिली. पद्मनाभा नारायणा आणि अवघा रंग एक झाला… या गीतांनी स्वरमैफलीला वेगळी उंची प्राप्त करुन दिली.
राम रंगी रंगले मन…मधून श्रीरामस्तुती
Date:

