महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार सर्वसामान्यांसाठी नसून अदानीसाठी काम करत आहे- अरविंद शिंदे

Date:

 पुणे- महाराष्ट्रात सर्व सामान्य घरगुती वीज दरात ६% वीजदरवाढ राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने केली त्याच्या निषेर्धात आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता पेठ येथील वीज नियामक मंडळाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आहे.

     यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे फक्त आणि फक्त अदानी, अंबानी यांच्यासाठी काम करीत आहेत. वीज दरवाढ ही कंपनीचे प्रायव्हेटायजेशन करून अदानीच्या घशात MECB घालण्याचा हा डाव आहे. सर्वसामान्य जनेतेच्या खिशाला कात्री लावून अडाणीचे घर भरण्याचे काम हे करीत आहेत. वीज दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार असून ऐन उन्हळ्यात त्यांना या गतिमान सरकारने शॉक दिला आहे. महागाई वाढत चाललेली असताना हा शॉक सर्वसामान्यांचे जीवन उध्वस्त करेल याचा आम्ही निषेध करतो. ही वीजदर वाढ रद्द केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. जनता येत्या काळात या सरकारमधील मंत्र्याना जाब विचारल्या शिवाय राहणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांसाठी नसून आदानीसाठी काम करणारे सरकार आहे त्याचा आम्ही निषेध करतो.’’

     यावेळी म.प्र.काँ. उपाध्यक्ष मोहन जोशी, रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, दिप्ती चवधरी यांचीही भाषणे झाली.यावेळी म.प्र.काँ. NSUI अध्यक्ष अमीर शेख, माजी नगरसेवक मनिष आनंद, अविनाश बागवे, रफिक शेख, अजित दरेकर, सुजाता शेट्टी, गोपाळ तिवारी, मेहबुब नदाफ, भीमराव पाटोळे, राजेंद्र शिरसाट, सुनिल शिंदे, सुजित यादव, रमेश अय्यर, शेखर कपोते, यशराज पारखी, ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, सतिश पवार, सुनिल घाडगे, रमेश सोनकांबळे, प्रदीप परदेशी, रमेश सकट, शोएब इनामदार, साहिल केदारी,

      शिलार रतनगिरी, नितीन परतानी, राजू शेख, गौतम अरकडे, प्रा. वाल्मिक जगताप, चेतन आगरवाल, प्रशांत सुरसे, अनुसया गायकवाड, सुंदरा ओव्हाळ, अंजली सोलापूरे, ज्योती परदेशी, सोनिया ओव्हाळ, माया डुरे, लतेंद्र भिंगारे, देवीदास लोणकर, शाबीर खान, दत्ता पोळ, सादिक कुरेशी, रवि पाटोळे, हेमंत राजभोज, मंगेश निरगुडकर, जयकुमार ठोंबरे, परवेज तांबोळी आदींसह काँग्रेस पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डेटा संरक्षण आणि पारदर्शकता यांचा समतोल आवश्यक-मुख्य सचिव राजेश अग्रवाल

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सज्जमुंबई, दि....

कर्ज कमी करायला मदत म्हणून नॉयडा येथील जमीन विक्रीचे नियोजन

एवररेडी इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 26च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये एकत्रित महसूल आणि EBITDA मध्ये...