Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अपस्टॉक्सतर्फे भारतीयांना त्यांच्या गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यात मदत करण्यासाठी ‘इन्व्हेस्ट राइट’ हे नवे कॅम्पेन

Date:

पुणे- – अपस्टॉक्स या भारतातील आघाडीच्या डिजिटल गुंतवणूक प्लॅटफॉर्मने इन्व्हेस्ट राइट’ हे नवे कॅम्पेन लाँच केले असून त्याअंतर्गत गुंतवणुकदारांना कुठे, कधी गुंतवणूक करावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे का गुंतवणूक करावी हे शिकण्यास मदत केली जाणार आहे.

हे कॅम्पेन इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) नवा सीझन सुरू होत असल्याचे औचित्य साधून सुरू करण्यात आले आहे. अपस्टॉक्स हे टाटा आयपीएलचे अधिकृत भागीदार आहेत. या कॅम्पेनच्या मदतीने भारतीयांची गुंतवणुकीची पद्धत बदलण्याचे – किंबहुना ज्या प्रकारे गेल्या दशकभरात आयपीएलने स्थित्यंतर केले आणि भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली, त्याप्रमाणे गुंतवणूक अधिक सोपी, अंतर्मुख आणि सहभागास प्रोत्साहन देणारी करण्याचे ध्येय कंपनीने ठेवले आहे.

यापूर्वीच्या ‘स्टार्ट करके देख लो’ या आयपीएल कॅम्पेनद्वारे भारतीयांना गुंतवणुकीच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यास प्रोत्साहन दिल्यानंतर यंदाचे कॅम्पेन ‘इनव्हेस्टिंग राइट’वर जास्त भर देणार आहे. गुंतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्यांची संख्या आज वाढत आहे, मात्र भरपूर पर्याय उपलब्ध असल्यामुळे त्यांचा गोंधळ होत आहे. म्हणूनच त्यांना मदत करण्यासाठी अपस्टॉक्सने अथक परिश्रम घेत त्यांच्यासाठी गुंतवणूक सोपी केली आहे.

भारताचा वेगाने विकास होत असून इक्विटी सहभागातून भारताच्या विकासाचा लाभ गुंतवणुकदारांनाही घेता येईल यावर ठाम विश्वास ठेवत अपस्टॉक्सचे कॅम्पेन भारतात कशाप्रकारे गुंतवणूक करावी यावर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यासाठी गुंतवणुकदारांना इंडेक्स फंड्सची ओळख करून दिली जाणार असून हा बाजारपेठेची कामगिरी जाणून घेण्याचा वाजवी, सोपा आणि दीर्घकालीन तसेच महागाईला बाजूला सारून संपत्ती वाढवण्याचा मार्ग उपलब्ध अपस्टॉक्स देणार आहे.

मात्र, म्युच्युअल फंड्समध्ये विविध पर्याय उपलब्ध असतात. हे अधिक सुलभ करण्यासाठी अपस्टॉक्सने शेकडो म्युच्युअल फंड योजनांचे त्यात समाविष्ट असलेली जोखीम, रिवॉर्ड रेशिओ यांच्या आधारे विश्लेषण करायचे महत्त्वाचे काम हाती घेत प्रत्येक विभागातील आघाडीच्या योजना निवडलेल्या आहेत. हे निवडक फंड्स आणि तज्ज्ञांच्या विश्लेषणाच्या मदतीने कंपनी युजर्सना म्युच्युअल फंड्समध्ये अपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम अनुभव देणार आहे. त्याशिवाय ब्रँडद्वारे माहिती व संशोधन उपलब्ध करून देत गुंतवणुकदारांना योग्य माहितीसह निर्णय घेण्यास मदत केली जाईल.

या सुविधेबरोबरच अपस्टॉक्सने भारतीयांना गुंतवणुकीशी संबंधित सोपे सत्य सांगत शिक्षित करण्याचे ठरवले आहे. उदा. एखाद्या व्यक्तीने १२.५ टक्के परतावा देणारा केवळ ५००० रुपयांचा एसआयपी सुरू केला आणि २५ वर्ष गुंतवणूक कायम ठेवायची ठरवली, तर त्यांचे पैसे कोटीपर्यंत वाढू शकतात. यावरून चक्रवाढीची संकल्पना लक्षात येते. त्याचप्रमाणे अपस्टॉक्सने पालन करण्यास सोपे असलेले प्रखर वास्तव शेयर करण्याचे ठरवले आहे. प्रत्येक सत्य तपशीलाबरोबरच आवश्यक कृतीची माहिती देत युजर्सना यशस्वी होण्यास मदत केली जाणार आहे. या कॅम्पेनमध्ये अपस्टॉक्सतर्फे म्युच्युअल फंड्स, टेक्नीकल विश्लेषण, ऑप्शन ट्रेडिंग यावर आधारित ऑनलाइन तसेच ऑफलाइन प्रशिक्षण सत्रांची मालिका आयोजित केली जाणार आहे. या कॅम्पेनच्या मदतीने अपस्टॉक्सने गुंतवणुकीचा समग्र, चौफेर दृष्टीकोन कसा विकसित करायचा हे सांगत गुंतवणुकदारांना शिकण्याची, निर्णय घेण्याची आणि अपस्टॉक्ससह गुंतवणूक व ट्रेड करण्याची संधी दिली जाईल.


हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात कॅम्पेनमध्ये दैनंदिन जीवनात दिसणाऱ्या व्यक्तीरेखा पाहायला मिळतील. उदा. दोन मित्र युपीआयच्या मदतीने नारळपाणी विक्रेत्याला पैसे देत आहेत. या उदाहरणाच्या मदतीने (युपीआय) कॅम्पेनमध्ये दोन्ही व्यक्तीरेखा व प्रेक्षकांमध्ये फोमो जागृत करत भारताच्या आर्थिक विकासात सहभागी होण्याचे संभाव्य फायदे अधोरेखित केले जातील. त्यावर भारतात गुंतवणूक करा, इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करा असे स्वाभाविक उत्तर त्यांच्यातील आर्थिकदृष्ट्या जास्त साक्षर असलेल्या व्यक्तीरेखेतर्फे दिले जाईल. ही व्यक्ती अपस्टॉक्समुळे योग्य माहिती मिळाल्याचे आणि त्यामुळे योग्य निवड करता आल्याचे सांगून अपस्टॉक्सचे आभार मानेल.

अशाप्रकारच्या वास्तविक उदाहरणांतून गुंतवणुकदारांमध्ये जागरूकता तसेच ब्रँडविषयी जिव्हाळा तयार करण्याचे ध्येय या कॅम्पेनने ठेवले आहे.

अपस्टॉक्सच्या सह- संस्थापक कविता सुब्रमण्यम या कॅम्पेनविषयी म्हणाल्या, ‘म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणुकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांच्या विकासात सहभागी होण्याची संधी मिळते. भारताच्या आर्थिक विकासासाठी आर्थिक सर्वसमावेशकता आवश्यक आहे. प्रत्येक गुंतवणुकदाराला गुंतवणुकीशी संबंधित दर्जेदार सल्ला व मार्गदर्शन मिळावे अशी अपस्टॉक्सची महत्त्वाकांक्षा आहे. या संदर्भात आमचे नवे कॅम्पेन तयार करण्यात आले असून ते भारतातील जास्तीत जास्त लोकांना योग्य साधने, स्त्रोत आणि मदत पुरवून योग्य फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यासाठी सक्षम करेल.’

सर्व भारतीयांना आपल्या आर्थिक बाजूचे नियंत्रण घेण्यासाठी आवश्यक ज्ञान व आत्मविश्वास विकसित करण्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. यामुळे त्यांना स्वतःसाठी तसेच आपल्या कुटुंबासाठी अधिक चांगले भविष्य उभारता येईल. आर्थिक सर्वसमावेशकतेचा प्रसार करत आणि गुंतवणुकविषयक दर्जेदार सल्ला जास्तीत जास्त लोकांना मिळवून देत समृद्ध अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी योगदान देता येईल असे आम्हाला वाटते.

हे कॅम्पेन भारताच्या विविध प्रदेशांतील दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांत राहाणाऱ्या १८ ते ३५ वर्ष वयोगटातील नागरिकांवर लक्ष केंद्रित करणार आहे. हे कॅम्पेन वेगवेगळ्या चॅनेल्सच्या माध्यमातून चालणार असून त्यात डिजिटल, सोशल आणि प्रिंट यांचा समावेश असेल. त्याला प्रत्यक्षात आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांची जोड दिली जाईल आणि इच्छित वर्गामध्येत जागरूकता निर्माण केली जाईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...